बेस्टची 'बेस्ट' शक्कल

  Pali Hill
  बेस्टची 'बेस्ट' शक्कल
  मुंबई  -  

  मुंबई - बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्ट प्रशासनानं नवीन शक्कल लढवलीय. बेस्टच्या जागा टेलिकॉम टॉवरसाठी भाड्यानं देऊन त्यातून महसूल गोळा करण्याचा निर्णय बेस्टनं घेतलाय. त्यानुसार यासाठी मागवण्यात आलेल्या निविदेला रिलायन्स जिओ आणि सुयोग टेलिकाँम कंपनीनं प्रतिसाद दिलाय. रिलायन्स जिओनं आठ तर सुयोग टेलिकाँमनं 65 ठिकाणी टाँवर उभारण्यास प्रतिसाद दिलाय. या निविदेला मंजुरी देण्यासंबंधीचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या येत्या बैठकीत ठेवण्यात येणाराय, अशी माहिती बेस्टमधील सुत्रांनी दिलीय.  रिलायन्स जिओ आणि सुयोग टेलिकाँमच्या 73 टाँवरसाठी बेस्ट दहा वर्षांसाठी जमीन भाड्यानं देणाराय. यामुळे दहा वर्षांत बेस्टच्या तिजोरीत कोट्यवधींची भर पडणार असल्याचं म्हटलं जातंय. तर रिलायन्स जिओनं आणखी 23 ठिकाणी टाँवर उभारण्यास उत्सुकता दाखवलीय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.