मुंबई लाइव्हचा दणका, बीकेसीतील पार्किंगचं शटर उघडलं

 BKC
मुंबई लाइव्हचा दणका, बीकेसीतील पार्किंगचं शटर उघडलं

बीकेसी - बीकेसीच्या जी ब्लॉकमधील एमएमआरडीएने गुरूवारी बंद केलेल्या तीन पार्किंगपैकी एक पार्किंग अखेर शुक्रवारी दुपारी वाहनांसाठी खुलं करण्यात आलं आहे. कंत्राटदार मिळत नसल्याने एमएमआरडीएने पार्किग बंद केल्याचं स्पष्ट केलं असलं तरी पर्यायी व्यवस्था बीकेसीतील वाहनचालकांना उपलब्ध करून दिली नव्हती. त्यामुळे वाहनचालकांना नजीकच्या रिलायन्स जिओच्या महागड्या पार्किंगमध्ये वाहने पार्क करावी लागणार होती. म्हणूनच रिलायन्स जिओच्या पार्किंगचा व्यवसाय वाढावा म्हणून तर हा घाट घातला गेला नाही ना अशी साशंकता निर्माण झाली होती. ही समस्या मुंबई लाइव्हच्या प्रेक्षकांनी समोर आणल्यानंतर त्याची दखल घेऊन मुंबई लाइव्हने विशेष रिपोर्ट तयार केला होता.

 

या समस्येबाबत मुंबई लाइव्हनं केलेला हा स्पेशल रिपोर्ट

 

 

 

मुंबई लाइव्हच्या दणक्यानंतर आता एमएमआरडीएला जाग आली असून तीनपैकी एक पार्किंग पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. तर मुंबई लाइव्ह आणि बीकेसी पार्किंग इश्यु ग्रुप इतर दोन पार्किंग सुरू करावेत यासाठी एमएमआरडीएकडे पाठपुरावा करणार आहेत.

Loading Comments