Advertisement

'या' मार्गानं पवईला जाताय? सावधान, आरेतील मिठी नदीवरील पूल बंद

पालिकेनं पुलाची पाहणी करून तो वापरण्यासाठी अयोग्य असल्याचं जाहीर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

'या' मार्गानं पवईला जाताय? सावधान, आरेतील मिठी नदीवरील पूल बंद
(File Image)
SHARES

गोरेगावला पवईशी जोडणाऱ्या मोरारजी नगरजवळील मिठी नदीवरील पूल बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) बंद केला आहे. पालिकेनं पुलाची पाहणी करून तो वापरण्यासाठी अयोग्य असल्याचं जाहीर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

पालिकेनं परिपत्रक काढलं आहे की, पुलाची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी होईपर्यंत पादचारी आणि वाहनांच्या वाहतुकीसाठी दोन्ही बाजूंनी हा पूल बंद ठेवला जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०१९ मध्ये पुलाचे ऑडिट केल्यानंतर महापालिकेनं या मार्गावरील वाहनांवर ये-जा करण्यास बंदी घातली. तथापि, बुधवारी, १६ डिसेंबर रोजी स्थायी समितीनं पुलाच्या पुनर्बांधणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या पुलाची पुनर्रचना करावी लागल्यानं प्रक्रिया लांबणीवर पडली.

दुचाकी वाहनांना तात्पुरता प्रवेश देण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. याशिवाय तोडफोड आणि पुनर्बांधणीचे कामही सुरू होईल. या पुर्नबांधकामास किमान एक वर्ष लागेल, परंतु पालिका पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.

शिवाय, हा पूल बंद होईपर्यंत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची खात्री पालिका घेईलच. पण प्रवाशांनी देखील वाहतूक पोलिसांसोबत सहकार्य करावं, असं आवाहन पालिकेनं केलं आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, हा पूल बंद झाल्यानं प्रवाशांना आणि जवळपास राहणाऱ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेच्या पुल विभागानं मागील वर्षी मिठी नदी पुलाच्या दोन्ही बाजूंनी पाच टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना प्रतिबंधित केले होते. मोठ्या कारचे वजन सुमारे ३ टन असते. तर ट्रक ५ टनापेक्षा जास्त असतो. यानंतर शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले.हेही वाचा

मेट्रो ३ कारशेडसाठी बीकेसीतील बुलेट ट्रेनच्या जागेची चाचपणी

दिल्ली-मुंबई महामार्ग २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा