SHARE

मुंबई- दादर आणि बांद्र्यात 8 आणि 9 नोव्हेंबरला पाणीपुवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पालिकेकडून ही माहिती देण्यात आलीये. जी उत्तर विभागातील धारावी येथे 96 इंच व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी आणि 1500 मीमी व्यासाची जलवाहिनी यांच्या जलजोडणीच्या कामासाठी पाणीपुवठा बंद ठेवण्यात येणार आहे. धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग आणि दिलीप कदम मार्ग येथील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहिल. तर जी उत्तर विभागातीलच प्रेमनगर, नाईकनगर, 60 फुटी रस्ता, जस्मिन मील मार्ग, 90 फुटी रस्ता, महात्मा गांधी मार्ग, धारावी लूप मार्ग, कुंभारवाडा येथील सकाळच्या वेळेचा पाणी पुरवठा बंद राहील. एच पूर्व विभागातील वांद्रे टर्मिनल आदी परिसरातील पाणी पुरवठा 24 तास बंद असणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावं असे आवाहन पालिकेने केलय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या