Advertisement

बीडीडी पुनर्विकासाला बिल्डरांचा पुन्हा ठेंगा


बीडीडी पुनर्विकासाला बिल्डरांचा पुन्हा ठेंगा
SHARES

मुंबई - नायगांव आणि डिलाईल रोड येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी बिल्डरांकडून सलग दुसऱ्यांदा ठेंगा दाखवण्यात आला आहे. केवळ दोनच निविदा सादर झाल्याने म्हाडाच्या मुंबई मंडळाला दुसऱ्यांदा निविदेला मुदतवाढ द्यावी लागली आहे. त्यानुसार आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ निविदेला देण्यात आल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी दिली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर बीडीडीच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. पण बिल्डर निविदेसाठी पुढेच येत नसल्याने प्रकल्प अडचणीत आला आहे. याआधीही निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने 27 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्याप्रमाणे सोमवारी 27 फेब्रुवारीला केवळ दोनच निविदा मंडळाकडे सादर झाल्या. किमान तीन निविदा सादर झाल्यानंतरच निविदा प्रक्रिया पुढे नेता येते. पण, दोनच निविदा सादर झाल्याने निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. पण यापुढेही निविदेला प्रतिसाद नाही मिळाला तर काय करायचे याबाबतचा निर्णय त्यावेळीच घेतला जाईल, असेही झेंडे यांनी स्षष्ट केले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय