परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी एसपीपीएलचे प्रयत्न

 Pali Hill
परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी एसपीपीएलचे प्रयत्न

मुंबई - आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना अर्थसहाय्य देत त्या मोबदल्यात परवडणारी घरं घेण्याची शिवशाही पुनर्विकास प्रकल्प लिमिटेड (एसपीपीएल)ची योजना काही केल्या मार्गी लागताना दिसत नाही. या योजनेला केवळ सहाच बिल्डरांनी प्रतिसाद दिलाय. त्यातही त्यांनी दिलेल्या घरांच्या किंमती 60 ते 70 लाखांच्या घरात असल्यानं ही योजना बारगळलीय. त्यामुळे आता पुन्हा या योजनेला गती देण्याचा निर्णय एसपीपीएलने घेतलाय. त्यानुसार पुन्हा नव्यानं आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या प्रकल्पातील बिल्डरांकडून दुसऱ्यांदा निविदा मागवल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबईसह मुंबई महानगरात परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीची जबाबदारी राज्य सरकारनं एसपीपीएलवरही टाकली आहे. पण एसपीपीएलकडे जागाच नसल्यानं ही जबाबदारी कशी पार पाडायची असा प्रश्न एसपीपीएलसमोर उभा ठाकलाय. दरम्यान हा प्रश्न सोडवण्यासाठी झोपुतून परवडणारी घरे मिळवण्याची योजना तर दुसरीकडे महसूल विभागाच्या जागा नाममात्र दरात विकत घेत त्यावर पडवणारी घरे बांधण्याचीही योजना आणली आहे. मात्र अजूनही या दोन्ही योजना मार्गी लागत नसल्यानं एसपीपीएलच्या अडचणी वाढतच चालल्याची चर्चा आहे.

Loading Comments