Advertisement

सिडकोच्या १४ हजार ८३८ घरांसाठी फुटणार लाॅटरी


सिडकोच्या १४ हजार ८३८ घरांसाठी फुटणार लाॅटरी
SHARES

कळंबोली, द्रोणागिरी, तळोजा, घणसोली आणि खारघर येथील १४ हजार ८३८ घरांसाठी मंगळवारी, २ आॅक्टोबरला लाॅटरी फुटणार आहे. तब्बल १ लाख ८० हजारांहून अधिक अर्जदार या लाॅटरीत सहभागी झाले असून या लाॅटरीत आता कोण बाजी मारणार? आणि कुणाच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार? हे मंगळवारी ११ वाजताच समजेल.


किती घरं?

सिडकोकडून पहिल्यांदाच पंतप्रधान आवास योजनेतील घरांची आणि मोठी लाॅटरी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे या लाॅटरीत केवळ गरीबांसाठी अर्थात अत्यल्प आणि अल्प गटासाठीच घरं आहेत. १७ लाख १४ हजार ते १८ लाख ५३ हजार अशा अत्यल्प गटातील घरांच्या किंमती आहेत.

तर, अल्प गटातील घरांच्या किंमती २५ लाख ६ हजार ते २६ लाख ३५ हजार अशा आहेत. या घरांच्या किंमती परवडणाऱ्या असल्यानं या १४ लाख ८३८ घरांसाठी १ लाख ८० हजारांहून अर्ज सादर झाले आहेत. जेव्हा की म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ९०१८ घरांसाठी लाॅटरी काढण्यात आली होती आणि या लाॅटरी अल्प प्रतिसाद मिळाला होता. केवळ ५५ हजार अर्ज सादर झाले होते.


प्रक्रिया पूर्ण

सिडकोच्या लाॅटरीची सर्व प्रक्रिया आता पूर्ण झाली असून लाॅटरी फुटायला केवळ काही तासच उरले आहेत. त्यामुळं अर्जदारांच्या धडधडही नक्कीच वाढली असेल. मंगळवारी सकाळी ११ वाजता बेलापूर येथील सिडको भवनच्या सातव्या मजल्यावर आॅनलाईन पद्धतीनं, म्हाडाप्रमाणं ही लाॅटरी काढण्यात येणार आहे. तर या लाॅटरीचे सिडकोच्या संकेतस्थळावर वेबकास्टींग आणि फेसबुक लाइव्हद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली आहे.



हेही वाचा-

११९४ घर आणि १०८ दुकानांची लाॅटरी; पण तारीख काही ठरेना

सिडको म्हाडावर भारी, 1 लाख 79 हजार 557 अर्ज सादर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा