शनिवारी, रविवारी मुंबईत पाणीकपात

 Mumbai
शनिवारी, रविवारी मुंबईत पाणीकपात

मुंबई - मुंबईकरांना शनिवारी आणि रविवारी दोन दिवस पाणीकपातीला सामोर जावं लागेल. महापालिकेने दिलेल्या माहीतीनुसार भांडुप पाईपलाईनवर पाईप बदलण्याच्या कामामुळे शनिवारी आणि रविवारी या दोन दिवशी मुंबईत 20 टक्के पाणी कपात होऊ शकते. पाईप बदलण्याचं काम शनिवारी सकाळी 9 वाजता सुरू होणार असून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत संपेल. तब्बल 16 तास एसीडीजी दक्षिण, जी उत्तर वॉर्डच्या परिसरात 20 टक्के पाणीकपात होण्याची शक्यता आहे. वांद्रे ते दहिसर परिसरात ही 20 टक्के पाणी कपात होऊ शकेल. त्यामुळे पाण्याचा बचाव करा असं आवाहन महापालिकेकडून मुंबईकरांना करण्यात आलं आहे.

Loading Comments