Advertisement

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रगतिपथावरील कामाची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली.

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ
SHARES

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. देशातील सर्वात आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

येत्या 30 सप्टेंबरपर्यंत हे विमानतळ प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रगतिपथावरील कामाची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद 'बॅग क्लेम सिस्टिम' विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख वैशिष्ट्य असावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिली. सद्यस्थितीत विमानतळाचे काम 94 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करून पहिले प्रवासी विमान उडणार, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या विमानतळाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते आणि त्याचे उद्घाटनही आता त्यांच्याच हस्ते होणार आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

'वॉटर टॅक्सी', विशेष कनेक्टिव्हिटी नेटवर्कची सुविधा

या विमानतळावर पोहोचण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतील. अंडरग्राऊंड मेट्रो ट्रेनची सुविधा दिली जाणार असून त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर थेट पोहोचणे सोयीचे ठरणार आहे. याशिवाय जलमार्गाद्वारे 'वॉटर टॅक्सी'ची सेवा देखील कार्यान्वित केली जाणार आहे.

नवी मुंबई, ठाणे, पनवेल, खोपोली, कल्याण या परिसरातील नागरिकांना विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र मार्गिका व विशेष कनेक्टिव्हिटी नेटवर्क उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईत 'ऑफ शोअर एअरपोर्ट' उभारणार

भारताला 'मेरीटाईम पॉवर' बनवणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट' होणार आहे. त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार आहे, जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट असेल. याचे काम लवकरच सुरू होईल. राज्यात सध्या 24 जिल्ह्यांमध्ये विमानतळ आणि धावपट्टीची सुविधा आहे.



हेही वाचा

पश्चिम रेल्वेवरील 7 स्थानकांना नवीन ट्रेन इंडिकेटर

वाढत्या गर्दीमुळे मध्य रेल्वेचे 800 कंपन्यांना पत्र

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा