Advertisement

वरळीतील बीडीडी पुनर्विकासासाठी निविदा मागवल्या


वरळीतील बीडीडी पुनर्विकासासाठी निविदा मागवल्या
SHARES

वर्षानुवर्षे रखडलेल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास मार्गी लावण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी निविदा मागवत कंत्राट अंतिम केल्यानंतर आता म्हाडाने आपला मोर्चा वरळीतील बीडीडी चाळींकडे वळवला आहे. त्यानुसार म्हाडाने नुकत्याच वरळीतील बीडीडी चाळींकरिता आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवल्या आहेत. 17 मे पर्यंत कंपन्यांना निविदा सादर करण्याची मुदत देण्यात आल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली आहे.

नायगावमधील बीडीडीच्या पूनर्विकासाचे कंत्राट शापुरजी-पालनजी कंपनीला तर ना.म. जोशी मार्गाचे कंत्राट एल अॅण्ड टी कंपनीला देण्यात आले. त्यानुसार आता लवकरच या दोन्ही पूनर्विकास प्रकल्पांच्या कामाचा शुभारंभ करण्याचा मानस म्हाडाचा आहे. तर दुसरीकडे काही तांत्रिक कारणांमुळे वरळीतील बीडीडी चाळींची निविदा रखडली होती. या तांत्रिक अडचणी अखेर म्हाडाने दूर केल्या आहेत. त्यामुळे आता वरळीतील बीडीडी चाळींसाठी निविदा मागवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार अखेर म्हाडाने वरळीसाठी निविदा मागवल्या आहेत. या निविदा अंतिम करत वरळीतील पूनर्विकासही लवकरात लवकर मार्गी लावण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे.

दरम्यान वरळी आणि नायगावमधील बीडीडीवासीयांचा म्हाडाला असलेला विरोध कायम आहे. तर वरळीमधील बीडीडीवासीयांना थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे बीडीडीवासीयांचे सर्व लक्ष उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लागले आहे. तर 9 एप्रिल रोजी वरळीत बीडीडीवासीयांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत बीडीडीवासीय आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती अखिल बीडीडी भाडेकरू संघाचे अध्यक्ष किरण माने यांनी दिली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा