Advertisement

'मुंबई पोर्टच्या जागेत कामगारांना घरे द्या'


'मुंबई पोर्टच्या जागेत कामगारांना घरे द्या'
SHARES

मुंबई - मुंबई शहराच्या विकासाबरोबर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या 1800 एकर जागेचा विकास होणार आहे. पोर्ट ट्रस्टच्या जागेवर गोदी कामगारांना आणि अधिकाऱ्यांना कायम स्वरूपी घरे देण्याची मागणी मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अॅडवोकेट एस. के. शेट्ये आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज यांनी केलीय. 

यासंदर्भात केंद्रीय नौकानयन, वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट अध्यक्ष संजय भाटिया यांच्याकडे लेखी निवेदन देऊन ही मागणी केली आहे. या मागणीसाठी युनियनतर्फे सातत्याने पाठपुरावाही केला जात आहे. मात्र अजूनही सरकराने याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. यासंदर्भातच डॉकयार्ड पूर्व येथील युनियनच्या कार्यालयात कामगारांची शनिवारी बैठक घेण्यात आली. 

या बैठकीनंतर मुंबई बंदरातील सर्व कामगार संघटना एकत्र येऊन गोदी कामगारांना पोर्ट ट्रस्टच्या जागेवर घरे देण्याच्या मागणीवर एक मत झाले आहे. लवकरच एक सयुंक्त लेखी निवेदन मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात येईल. कारण मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विकासात गोदी कामगार आणि अधिकाऱ्यांचे योगदान आहे. तेव्हा मुंबई पोर्ट ट्रस्टचा विकास करताना प्रथम गोदी कामगारांना आणि अधिकाऱ्यांना घरे देण्याचा विचार व्हावा, अशी चर्चा या बैठकीत करण्यात आली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा