Advertisement

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 2024 मध्ये कार्यान्वित होईल : देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई विमानतळाला पुण्याशी जोडले जाईल अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 2024 मध्ये कार्यान्वित होईल : देवेंद्र फडणवीस
(File Image)
SHARES

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वपूर्ण विकासामध्ये, बांधकामाधीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 2024 मध्ये कार्यान्वित होईल, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) या कार्यक्रमात त्यांनी माहिती दिली.

महाराष्ट्राची ‘औद्योगिक संस्कृती’ लवकरच रुळावर येईल, असेही फडणवीस म्हणाले. "महाराष्ट्राला पुन्हा एकदा नंबर वन करण्यासाठी प्रत्येक संबंधितांना एकजुटीने काम करावे लागेल," असे ते म्हणाले.

तसंच ते म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाला पुण्याशी जोडले जाईल, यामुळे पुण्याला त्याचा फायदा होईल. पुण्याच्या आर्थिक विकासात पुणे विमानतळाचे मोठे योगदान आहे. जगातील प्रमुख देश पुण्याशी जोडले गेले आहेत. पुणे येथून विमानाच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. सद्ध्याचे विमानतळ एका मर्यादेहून अधिक क्षमतेने चालणं शक्य नसल्याने पुण्यासाठी नवे विमानतळ तयार करणे आवश्यक आहे. पुरंदर येथे नवे विमानतळ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. येथे विमानतळासोबत कार्गो आणि लॉजीस्टिक पार्क उभारण्याचाही विचार करण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, एमएमआरडीए आणि पीएमआरडीए या दोन भागांत मोठा विकास अपेक्षित आहे. पुणे हे औद्योगिक उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. इथून मोठ्या प्रमाणात निर्यातही होते. पुण्याने नुकत्याच जाहीर झालेल्या ‘ग्लोबल स्टार्टअप इंडेक्स’ मध्ये ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’च्या रुपात आपले महत्त्वाचे नाव प्राप्त केले आहे. आपल्याला यापेक्षाही अधिक प्रगती करायची आहे.

महाराष्ट्र देशातील स्टार्टअपचे केंद्र आहे आणि पुणे हे महाराष्ट्रातील स्टार्टअपचे प्रमुख केंद्र आहे. देशातील 80 हजारातील 15 हजार स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत. देशातील 100 युनिकॉर्नपैकी 25 युनिकॉर्न महाराष्ट्रात आहेत. राज्यात अशा उद्योगांसाठी आवश्यक औद्योगिक वातावरण निर्माण झाले आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा

ऑक्टोबरच्या 'या' तारखेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी बंद

मुंबईतील 'हा' पूल जून २०२४ पर्यंत वाहतूकीसाठी राहणार बंद

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा