Advertisement

ऑक्टोबरच्या 'या' तारखेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी बंद

परिणामी, या काळात विविध कंपन्यांच्या विमान सेवा रद्द कराव्या लागणार आहेत.

ऑक्टोबरच्या 'या' तारखेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी बंद
SHARES

पावसाळानंतर विविध कामानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (मुंबई विमानतळ) दोन्ही धावपट्ट्या येत्या १८ ऑक्टोबरला सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. परिणामी, या काळात विविध कंपन्यांच्या विमान सेवा रद्द कराव्या लागणार आहेत.

मुंबई विमानतळावर १४/३२ आणि ०९/२७ अशी मुख्य, तसेच पर्यायी धावपट्टी आहे. ही धावपट्टी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या सहा तासांत देखभाल, दुरुस्तीचे कामे करण्यात येणार आहे.

सायंकाळी ५ नंतर पुन्हा धावपट्टी विमान उड्डाणासाठी खुली करण्यात येणार आहे. धावपट्टीच्या दुतर्फा असलेले दिवे, एरोनॉटिकल ग्राउंड दिव्यांमध्ये बदल बदल करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या काळातील विमान उड्डाणांबाबत संबंधित विमान कंपन्यांकडून माहिती घ्यावी, असे आवाहन मुंबई विमानतळ प्रशासनाने केले आहे.

याआधी दोन्ही धावपट्ट्या पावसाळापूर्व कामांसाठी १० मे रोजी सहा तास बंद ठेवण्यात आल्या होत्या. सध्या विमानतळावर दररोज ८०० हून अधिक विमान उतरतात आणि उड्डाणे होतात. मुंबई विमानतळावर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानांची वर्दळ वाढली असून प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे.



हेही वाचा

मुंबईनंतर आता ठाण्यातही धावणार इलेक्ट्रिक बस

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू होऊ शकते

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा