Advertisement

मुंबईनंतर आता ठाण्यातही धावणार इलेक्ट्रिक बस

लेक्ट्राला ठाणे महापालिकेकडून 185 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे.

मुंबईनंतर आता ठाण्यातही धावणार इलेक्ट्रिक बस
SHARES

मुंबई महापालिकेनंतर ठाणे महापालिकेनेही आपल्या बसच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेने ऑलेक्ट्रा (Olectra Greentech) कंपनीला इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर दिली आहे. ऑलेक्ट्राला ठाणे महापालिकेकडून 185 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे.

राज्य प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर भर देत आहे. ऑलेक्ट्रा कंपनी महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. Olectra Greentech Limited आणि Eway Trans Private Limited (EVEY) च्या कंसोर्टियमला ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून ही ऑर्डर देण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेने ऑलेक्ट्रा कंपनीला 123 ई-बसची ऑर्डर दिली आहे. या बसेस 9 महिन्यांत डिलिव्हरी केल्या जातील. या बसेसमध्ये 55 (45 वातानुकूलित आणि 10 नॉन एसी) 12 मीटर बसेस आहेत.

आणखी 68 ई-बस (26 वातानुकूलित, 42 नॉन-एसी) -9 मीटरच्या आहेत. 12-मीटरच्या बसेसची रेंज 200 किमी असेल आणि त्यांची आसनक्षमता चालकसह 39 प्रवाशांची असेल. 9 मीटर बसेसची रेंज 160 किमी असेल आणि चालकासह 31 पेक्षा जास्त लोक या बसमध्ये बसू शकतील. लिथियम आयन बॅटरी असलेल्या या बस चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकतात.

याबाबत बोलताना ऑलेक्ट्रा कंपनीचे अध्यक्ष के व्ही प्रदीप म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याकडून आणखी एक ऑर्डर मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे. यासह आमची उपस्थिती आणखी एका शहरात ठाण्यात वाढली आहे. आम्ही आधीच पुण्यात इलेक्ट्रिक बस चालवत आहोत, मुंबई आणि नागपूरमध्येही काम सुरू आहे.''



हेही वाचा

मुंबईतील टॅक्सी चालक 26 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर

कोकणकन्या झाली 'सुपरफास्ट', ट्रेन नंबर आणि वेळापत्रकात मोठा बदल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा