Advertisement

कोकणकन्या झाली 'सुपरफास्ट', ट्रेन नंबर आणि वेळापत्रकात मोठा बदल

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या एकूण प्रवासात तब्बल दोन तास दहा मिनिटे बचत होणार आहे.

कोकणकन्या झाली 'सुपरफास्ट', ट्रेन नंबर आणि वेळापत्रकात मोठा बदल
SHARES

कोकण रेल्वेमार्गे रोज धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस आजपासून सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून धावेल. कोकणकन्या विद्युत इंजिनसह धावत असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. यामुळे कोकणकन्या एक्स्प्रेसच्या एकूण प्रवासात तब्बल दोन तास दहा मिनिटे बचत होणार आहे.

कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरील प्रवासी रेल्वे गाडय़ा या महिन्यापासून टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार आहेत.

कोकणकन्या एक्स्प्रेस आतापर्यंत 10112 व 10111 या क्रमांकासह धावत होती. आता ही गाडी डिझेलऐवजी विद्युत इंजिनवर धावणार असल्याने एक्स्प्रेसऐवजी ती आता सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. गाडीच्या क्रमांकातही कोकणकन्या एक्स्प्रेस 20111/ 20112 असा बदल करण्यात आला आहे.

मुंबई सीएसएमटीहून मडगावकडे येताना सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेस 20111 आधीप्रमाणे रात्री 11.5 मिनिटांनी सुटणार असून पनवेलपर्यंत या डाऊन गाडीच्या वेळापत्रकात बदल झाला श्राहे.

गाडी स्पीडअप झाल्यामुळे खेड स्थानकावर ती आधीच्या पहाटे 3.20 ऐवजी 3.04 मिनिटांनी येईल. चिपळूणला आधी 3.58 ला यायची मात्र आता ती 3.30 मिनिटांनी येईल.

संगमेश्वरला डाऊन कोकणकन्या आधी पहाटे 4.38 मिनिटांनी यायची आता ती 4.02 मिनिटांनी येईल. रत्नागिरी स्थानकावर पूर्वीच्या 5.25 ऐवजी 4.25 मिनिटांनी येईल.

मुंबईहून येताना कणकवलीला पूर्वी कोकणकन्या एक्स्प्रेस 7.52 आणि पोहोचायची आता ती 6.43 मिनिटांनी पोहोचेल. पूर्वी दुपारी 12.10 मिनिटांनी मडगावला पोहोचणारी आता दुपारऐवजी सकाळी 9.46 मडगावला आपला प्रवास संपवणार आहे.

कुठे कधी थांबणार

ही गाडी आतापर्यंत मडगावहून सायंकाळी 4.50 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 5.40 मिनिटांनी मुंबई सीएसएमटी स्थानकाला पोहोचत होती. आता ही गाडी मडगावहून 2 तास 10 मिनिटे उशिराने सुटणार.

ही गाडी मडगावहून सायंकाळी 4.50 ऐवजी 7 वाजता सुटली आहे. असे असले तरी मुंबईत सीएसएमटी स्थानकावर ती आधीच्याच 5.40 मिनिटांनी पोहोचणार आहे.

सुपरफास्ट कोकणकन्या एक्प्रेस सावंतवाडीला रात्री 8.36 मिनिटांनी, कुडाळला रात्री 8.58, कणकवलीला रात्री 9.28 मिनिटांनी, राजापूरला 10.14 मिनिटांनी, रत्नागिरी स्थानकावर रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी, चिपळूणला मध्यरात्रीनंतर 1.28 मिनिटांनी तर खेडला ती रात्री 1.55 मिनिटांनी पोहोचेल.



हेही वाचा

यात्री ऍपवरून दिसणार प्रवाशांचे लाईव्ह लोकेशन

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये वाढ, आता 'इतके' पैसे आकारणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा