Advertisement

यात्री ऍपवरून दिसणार प्रवाशांचे लाईव्ह लोकेशन

मध्य रेल्वेने (CR) 13 सप्टेंबर 2022 रोजी GPS लाइव्ह लोकेशन ऑफ ट्रेन्स फंक्शन जारी केले, ज्यामुळे मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करता आले.

यात्री ऍपवरून दिसणार प्रवाशांचे लाईव्ह लोकेशन
(File Image)
SHARES

लोकल प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने अलीकडेच सुरू केलेल्या यात्री ऍपवर नवीन अनोखी सुविधा सुरू केली आहे. त्यानुसार आता प्रवाशांना यात्री ऍपवरून आपले लाईव्ह लोकेशनही नातेवाईकांना शेअर करता येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी घरी पोहचण्यास उशीर झाल्यास नातेवाईकांना प्रवाशांचे नेमके लोकेशन कळू शकणार आहे.

लोकलचे वेळापत्रक आणि लाईव्ह लोकेशन जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेने अलीकडेच यात्री ऍप विकसित केले आहे. त्यावर केवळ लोकलचे वेळापत्रक, लोकल कुठपर्यंत आली, लोकल उशिराने धावत आहे का आदी माहिती मिळत होती.

13 जुलै 2022 पासून मध्य रेल्वेने यात्री ऍपवर आपले लाईव्ह लोकेशन शेअर करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. रात्रीच्या वेळी उशीर झाल्यास आपल्या कुटुंबीयांना आपले लोकेशन कळवता येणार आहे.

मुंबई विभागानं गेल्या वर्षी लाँच केलेल्या या अॅपचा प्रवाशांना फायदा होणार आहे आणि अहवालानुसार, एक लाखाहून अधिक लोकांनी अॅप डाउनलोड केलं आहे, ज्यामुळे प्रवाशांना माहिती मिळेल.

उपनगरीय गाड्या आणि स्थानकांची माहिती देण्यासाठी प्रवाशांना उपयुक्त

स्थानांचे रिअल-टाइम ट्रॅकिंग

  • ट्रेन लाइव्ह अपडेट्स आणि घोषणांबद्दल प्रामाणिक माहिती
  • अचूक स्टेशन सुविधा
  • मुंबई मेट्रो आणि मोनोरेल या एक्स्प्रेस गाड्यांची माहिती
  • प्रवासी पीएनआर स्थिती तपासू शकतात

हे कसं काम करतं?

लोकल ट्रेनचे वास्तविक-वेळेचे स्थान मिळवण्यासाठी इन-हाऊस अल्गोरिदम विकसित केला आहे. हे विशिष्ट ट्रेनच्या वर्तमान स्थानाविषयी सर्व आवश्यक माहिती गोळा करते आणि तीच अॅपमध्ये प्रदर्शित केली जाते, जी दर ३० सेकंदांनी रीफ्रेश होते.

यात्री अॅपच्या तांत्रिक टीमच्या सदस्यानं सांगितलं की, वापरकर्ते ते मॅन्युअली अपडेट करण्यासाठी रिफ्रेश बटणावर क्लिक करू शकतात.

यापूर्वी ६ मार्च रोजी मुंबई विभागाच्या वार्षिक तपासणीदरम्यान मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी यात्री अॅप बूथला भेट दिली होती.

बूथवर उपस्थित असलेल्या यात्री अॅपच्या तांत्रिक टीमनं त्यांना लोकल ट्रेनच्या लाइव्ह लोकेशन्सचे रिअल-टाइम ट्रॅकिंगचे प्रात्यक्षिक दिले होते. अॅपच्या रिअल टाइम मॉनिटरिंग क्षमतेव्यतिरिक्त, टीमनं यात्री अॅपची इतर अनेक वैशिष्ट्ये देखील प्रदर्शित केली होती.



हेही वाचा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये वाढ, आता 'इतके' पैसे आकारणार

मुंबईकरांना दिलासा! टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा संप टळला

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा