Advertisement

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये वाढ, आता 'इतके' पैसे आकारणार

जीवनाश्यक वस्तूंचे दरही गगणाला भिडत आहे. यावरुन सरकारवर टीकास्त्र होत असतानाच आता वाहतूक दारांनाही या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये वाढ, आता 'इतके' पैसे आकारणार
SHARES

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरचा प्रवास आता महाग होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलमध्ये 18 टक्के वाढ होणार आहे. ही वाढ 1 एप्रिल 2023 पासून असेल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांना जास्त टोल भरावा लागणार आहे.

2004 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने (MSRDC) मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील टोल दर तीन वर्षांनी 18 टक्क्यांनी वाढवण्याची सूचना केली. त्यानंतर सरकारने टोल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

कसे आहेत नवीन दर

वाहन प्रकार वर्तमान टोल (रूपये)वाढलेला टोल (रूपये)
कार  
270       
320 
टँपो
420
495
ट्रक
580
685
बस
797 
940
थ्री  एक्सेल 
1380
1380
एम एक्सेल 
1835
2165


मुंबई-पुणे या एक्सप्रेसवर सध्या 195 रुपये असा टोल आकारला जात आहे. शिवाय या मार्गावर वाहनधारकांची संख्याही अधिक आहे. असे असतानाच आता 1 एप्रिलपासून 18 टक्के टोलमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना 195 रुपयांवरुन 203 रुपये मोजावे लागणार आहेत.

वाहनधारकांच्या खिशाला झळ

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय ये-जा करणारेही अधिक आहेत. अशातच आता टोलमध्ये वाढ होणार असल्याने जाण्यागणीस 8 रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत.

1 एप्रिल 2020 रोजी टोल वाढवण्यात आला

यापूर्वी 1 एप्रिल 2020 रोजी टोलमध्ये वाढ करण्यात आली होती. पुढील वर्षी १ एप्रिलपासून टोलचे दर वाढणार आहेत. तथापि, सार्वजनिक बांधकाम विभागाने असेही म्हटले आहे की 1 एप्रिल 2023 पासून लागू होणारे टोलचे दर 2030 पर्यंत सुरू राहतील आणि 2030 पर्यंत बदलले जाणार नाहीत.



हेही वाचा

mumbai"="" target="_blank">Mumbai Local News: 16-17 सप्टेंबरला 'या' रेल्वे सेवांवर परिणाम होणार">Mumbai Local News: 16-17 सप्टेंबरला 'या' रेल्वे सेवांवर परिणाम होणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा