एमएमआरसीमधील कर्मचाऱ्यांना आता ड्रेसकोड

  Mumbai
  एमएमआरसीमधील कर्मचाऱ्यांना आता ड्रेसकोड
  मुंबई  -  

  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)मधील महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांसाठी एमएमआरसीने ड्रेसकोड निश्चित केला आहे. त्यानुसार पुरुषांसाठी फॉर्मल ट्राऊजर, टाय, जॅकेट, बिझनेस सुट असा ड्रेसकोड ठरवण्यात आला आहे. महिलांसाठी फॉर्मल पॅन्ट, टॉप्स, शर्टस्, जॅकेट, लांब स्कर्ट, साडी, पंजाबी ड्रेस असा ड्रेसकोड ठरवण्यात आला आहे. एमएमआरसीच्या एचआर विभागाने नुकतेच यासंबंधीचे एक परिपत्रक जारी केले आहे.

  मेट्रो-3 प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या एमएमआरसीमध्ये मोठ्या संख्येने तरुण कर्मचारी-अधिकारी वर्ग आहे. दरम्यान, कुठल्याही सरकारी यंत्रणेमध्ये फॉर्मल कपडेच परिधान केले जातात. अशावेळी एमएमआरसीमधील कर्मचाऱ्यांकडून मात्र या ड्रेसकोडचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत असल्याचे म्हणत एचआर विभागाने आपल्या कर्चमारी-अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला आहे. त्यासंबंधीचे परिपत्रक नुकतेच जारी केले असून हे परिपत्रक 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागले आहे. या परिपत्रकानुसार जीन्स, डेनिम, टी शर्ट, कॉलर नसलेले टी शर्ट, तोकडे कपडे आणि इतर कोणतेही फॅन्सी कपडे घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर पुरुषांसाठी आणि महिलांसाठी निश्चित ड्रेसकोड ठरवण्यात आला आहे.

  ड्रेसकोडमध्ये शरीरावरील गोंदण, टॅटूवरही बंदी घालण्यात आली आहे. एमएमआरसीच्या या फतव्यासंबंधी विचारणा करण्यासाठी एमएमआरसीच्या एचआर विभागाच्या प्रमुखांशी संपर्क साधला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एमएमआरसीच्या प्रवक्त्या नॉट रिचेबल होत्या.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.