मोटरमनशिवाय धावणार मेट्रो

 Mumbai
मोटरमनशिवाय धावणार मेट्रो

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ही मोटरमन शिवाय चालणारी मेट्रो असणार असल्याची माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली आहे. ड्रायव्हर लेस मेट्रो या संकल्पनेतून मेट्रो गाड्यांचे आणि सिग्नल यंत्रणेची रचना करण्यात येणार आहे.

सध्या मुंबईत धावणारी मेट्रो ही मोटरमनच्या माध्यमातून धावते. मेट्रो 3 मध्ये मात्र मोटरमनच नसणार आहे. मेट्रो 3 सेवेत दाखल होताना काही दिवस केवळ सुरक्षेच्या दृष्टीने मोटरमन मेट्रो गाड्यांमध्ये असणार आहे. त्यानंतर मात्र मोटरमनशिवाय मेट्रो धावणार आहे. सुरक्षित अंतरावर मेट्रो धावणार असल्याने मानवी हस्तक्षेप टाळून प्रवास करता येणार आहे.

Loading Comments