Advertisement

मुंबईतल्या 'इतक्या' बांधकामांना OC प्रमाणपत्र नाही


मुंबईतल्या 'इतक्या' बांधकामांना OC प्रमाणपत्र नाही
SHARES

मुंबईत ठीकठिकाणी टोलेजंग इमारतींच बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी बांधकाम पूर्णही झालं. परंतु, ही बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे, ऑक्युपेशन सर्टिफिकेट. मात्र, बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही अनेक सोसायट्याकडे ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसतं. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत २ लाखापेक्षा जास्त बांधकाम झाली आहेत. पण यातील निम्म्या बांधकामांना ओसी प्रमाणपत्रच मिळालेलं नाही असे रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा आहे.

मुंबई शहरात जवळपास २.३५ लाख बांधकाम आहेत. यात व्यावसायिक आणि रहिवाशी दोन्ही प्रकारच्या बांधकामांचा समावेश आहे. पण ५० टक्के बांधकामांना ओसी प्रमाणपत्रच मिळालेलं नसल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत कुठलीही इमारत बांधताना परवानगीचे वेगवेगळे टप्पे पार करावे लागतात. ओसी प्रमाणपत्र हा शेवटचा टप्पा असतो. ओसी मिळाल्यानंतर गृह खरेदीदार फ्लॅटमध्येच रहायला येऊ शकतात. ओसी प्रमाणपत्र मिळण्याआधीच इमारीत रहायला गेलेल्या रहिवाशांविरोधात कारवाई करण्याचे आदेश जुलै महिन्यात देण्यात आले होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा