Advertisement

एसआरएला गंडवलेल्या विकासकावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश


एसआरएला गंडवलेल्या विकासकावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश
SHARES

झोपटपट्टी पुनर्विकास संस्थेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळेच आज सामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. एसआरएचा असाच एक मोठा घोटाळा 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागला आहे. एसआरएला 2011 पासून के. मोरदानी रियाल्टी या विकासकाकडून 230 घरे मिळणार होती. मात्र विकासक आणि झोपटपट्टी पुनर्विकास संस्थेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आर्थिक संबधामुळे एसआरएला 230 घरे तर मिळालीच नाही उलट एसआरए अशा विकासकांवर कारवाई करण्यासाठीही टाळाटाळ करताना दिसत आहे.

काय आहे प्रकरण?
विकास नियंत्रण नियमावली 33 (14) (डी) परमन्ट ट्रान्झिट कॅम्पच्या बदल्यात 0.75 एफएसआय आणि विकासकास विक्री घटकाकरता 0.75 एफएसआय अशी एकूण 2.5 एफएसआय एकूण प्लॉट क्षेत्रफळ विकासकाला मिळते. याबदल्यात विकास नियंत्रण नियमावली 33 (14) डी नियमानुसार के मोरदानी रियाल्टी या विकासकाने एसआरए प्राधिकरणाला पीटीसी म्हणजे (परमन्ट ट्रान्झिट कॅम्प) बांधून देणे गरजेचे होते. पण के. मोरदानी रियाल्टीने वेगवेळ्या ठिकाणी आपल्या इमारती बांधल्या. मात्र या बांधलेल्या इमारतीमधील एकही घर परमन्ट ट्रान्झिट कॅम्प म्हणून एसआरएला दिले नाही.

मुंबईतील कुठे आहेत के. मोरदानी रियाल्टीचे प्रोजेक्ट?

1) जी-620, व्हिलेज, वांद्रे, 15 वा रोड, खार (प.)- 22

2) ई-144, प्लॉट क्रं. 680 व्हिलेज, वांद्रे, सोळावा रोड, खार (प.) 17+6

3) ई-170 व्हिलेज वांद्रे सोळावा रोड, खार (प.) - 29

4) वांद्रे व्हिलेज, एफ. पी नं. 33 आणि 335 टीपीएस III, सोळावा रोड, खार (प.) -26

5) ई-388 वांद्रे व्हिलेज, सोळावा रोड, खार (प.) - 22

6) न. भू. क्र 85,85/1 ते 85/58 व 86 जोगेश्वरी (पू) - 108

एकूण 230 घरे या विकासकाने एसआरएला देणे गरजेचे आहे. 2011 पासून शासकीय योजनेचा फायदा उचलला मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने 230 घरे कधीच एसआरएला दिली नाहीत.

एसआरए प्राधिकरणाला 2011 पासून के मोरदानी रियाल्टी विकासकाने फसवले आहे. एसआरएच्या अधिकाऱ्यांनी याकडे मुद्दाम कानाडोळा केला होता. एसआरए प्राधिकरणाला फसवणाऱ्या के. मोरदानी रियाल्टीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांचीही चौकशी लावण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये अशा प्रकारचा घोटाळा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- रवींद्र वायकर, गृहनिर्माण राज्य मंत्री

यासंदर्भात मुंबई लाइव्हने के. मोरदानी रियाल्टीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा