Advertisement

घरासाठी अर्ज न केलेल्या गिरणी कामगारांसाठी खुशखबर


घरासाठी अर्ज न केलेल्या गिरणी कामगारांसाठी खुशखबर
SHARES

मुंबई – हक्काच्या घरासाठी दीड लाख गिरणी कामगारांनी म्हाडाकडे अर्ज केले आहेत. मात्र त्याचवेळी अजूनही हजारो गिरणी कामगार केवळ अर्ज भरू न शकल्याने या कामगारांना योजनेचा लाभ मिळताना दिसत नाही. आता मात्र या कामगारांचेही हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. एप्रिलपासून अर्ज न केलेल्या कामगारांकडून-वारसांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेतले जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘मुंबई लाइव्ह’ला दिली आहे. 1982 मध्ये अडीच लाख कामगार होते. मात्र दीड लाख कामगारांना अर्ज भरता आले. त्यामुळे उर्वरित कामगारांनाही न्याय द्यावा अशी मागणी आहे. मात्र सरकारने ही मागणी फेटाळल्याने गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत देखरेख समितीला तसे आदेशही महिन्यांभरापूर्वी दिले. या आदेशानुसार अखेर म्हाडाने आता या कामगारांकडून अर्ज भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे आणि म्हाडाच्या निर्णयामुळे आपल्या लढ्याला यश आल्याचे म्हणत कल्याकारी संघाचे चिटणीस हेमंत राऊळ यांनी याचा फायदा एक लाख कामगार-वारसांना होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा