Advertisement

भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा नोव्हेंबरमध्ये सुरू होईल

मुंबईकरांसाठी प्रवास आणखी सोपा आणि कमी वेळेत होणार आहे.

भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा नोव्हेंबरमध्ये सुरू होईल
SHARES

भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा हा मुंबईत बांधला जाणार आहे. गिरगावजळ या बोगद्याला सुरुवात होईल आणि तो उत्तरेकडे अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी आणि मलबार हिलच्या खाली सुरू होतो आणि ब्रीच कँडी पार्क इथं संपतो. यामुळे मुंबईकरांसाठी प्रवास आणखी सोपा आणि कमी वेळेत होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून हा बोगदा बांधण्यात येत आहे, जो मुंबई कोस्टल रोड प्रकरल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पासाठी १२,७२१ कोटी रुपरे खर्च करण्यात येणार आहेत. हा बोगदा १०.५८ किमी लांब MCRP मरीन ड्राइव्हला वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडण्यात येणार आहे. या बोगद्याचं काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या बोगद्याची निर्मिती झाल्यानंतर गिरगाव ते वरळी हे अंतर कमी होणार असून ४५ मिनिटांचा प्रवास अवघ्या १० मिनिटांत पूर्ण होणार आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या बोगद्याचा व्यास १२.१९ मीटर आहे. तर त्याची खोली ही समुद्रसपाटीपासून १७-२० मीटर आहे. महत्त्वाचं म्हणजे या बोगद्याचा सुमारे १ किलोमीटरचा भाग समुद्राखाली बांधण्यात येणार आहे.

हा समुद्राखालील बोगदा तयार करण्यासाठी फायबर ग्लासचा वापर करण्यात येणार आहे. मलबार हिलमधील बोगद्याचा भाग हा ७२ मीटर खोल असणार आहे. बोगद्याच्या आतमध्ये ६ क्रॉसिंग आहेत. पादचाऱ्यांसाठी चार तर दुचाकीस्वारांसाठी दोन मार्ग असणार आहेत. टॅलनमध्ये ३.२ मीटरच्या ३ लेख आहेत. तर तिसरी लेन ही आपतकालीन व्यवस्थेसाठी वापरली जाणार आहे.



हेही वाचा

मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गावर 4 हेलिपॅड्स उभारण्याची योजना

लोअर परळ उड्डाणपुलाची एक लेन 'या' महिन्यापर्यंत खुली होणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा