• चर्चगेट स्थानकावर सौरऊर्जा प्रणालीचा शुभारंभ
SHARE

चर्चगेट - मुंबईच्या उपनगरांचा विस्तार वाढत असतानाच त्या भागातील लाखो रहिवाशांना प्रवासी सुविधा देण्यासाठी रेल्वे विविध पर्याय तपासून पाहत आहे. पश्चिम रेल्वेतर्फे शनिवारी चर्चगेट स्थानकावर सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात आली आहे. त्या सौरऊर्जा प्रणालीचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. पश्चिम रेल्वेतर्फे वीज बिल कमी येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. चर्चगेट स्थानकासोबतच इतर स्थानकावर जिकडे शक्य होईल तिकडे सौरउर्जा प्रणाली बसवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सौरऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी 75 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. याची क्षमता 100KWP असून प्रति वर्षी 1.5 लाख युनिट ऊर्जा या प्रणालीद्वारे तयार करण्यात येणार आहे. पहिल्यांदा हा प्रयोग पश्चिम रेल्वेतर्फे करण्यात आला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या