Advertisement

डीएसकेला महारेराचा दणका


डीएसकेला महारेराचा दणका
SHARES

गुंतवणूकदरांची फसवणूक केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या डी. एस. कुलकर्णी यांनी ५० कोटी भरावेत अन्यथा त्यांना अटक करावी, असे आदेश देत उच्च न्यायालयाने याआधीच डीएसकेंना दणका दिला आहे. असं असताना आता महारेरानेही डीएसकेंना दणका देत त्यांच्या अडचणीत मोठी वाढ केली आहे. डीएसकेंनी आपली फसवणूक केल्याचे म्हणत महारेराकडे धाव घेतलेल्या एका तक्रारदाराला घरासाठी भरलेल्या रक्कमेवर १०.५० टक्क्यांनी व्याज द्यावे, असे आदेश नुकतेच महारेराने दिले आहेत.


संपूर्ण प्रकार

गणेश लोणकर नावाच्या ग्राहकाने डीएसकेविरोधात महारेराकडे तक्रार केली होती. लोणकर यांनी डीएसकेंच्या पुण्यातील एका प्रकल्पात घर खरेदी केलं होतं. घराची साडे चार लाखांची रक्कमही अदा केली होती. पण डीएसकेंकडून घराचा ताबा निश्चित वेळेत दिले न गेल्याने लोणकर यांनी महारेराकडे धाव घेतली होती.


महारेराकडून डिएसकेंना दणका

या तक्रारीनुसार डीएसकेने महारेरा कायद्याचं उल्लंघन केल्याचं म्हणत महारेराने डिएसकेंना दणका दिला आहे. लोणकर यांनी भरलेल्या घराच्या रकमेवर १०. ५० टक्के व्याज जून २०१७ पासून घराचा ताबा मिळेपर्यंत द्यावे. याचबरोबर तक्रारीसाठीच्या खर्चाची २० हजारांची रक्कमही लोणकर यांना डी. एस. केंनी द्यावी, असे आदेश महारेराने दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे यापुढील घराचे सर्व मासिक हप्तेही डिएसकेंनीच भरावेत असंही महारेराने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. अडचणीत असलेल्या डी. एस. केंसाठी हा मोठा दणका मानला जात आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा