माहीम सबवे पुन्हा एकदा दुरवस्थेत

 MAHIM
माहीम सबवे पुन्हा एकदा दुरवस्थेत
माहीम सबवे पुन्हा एकदा दुरवस्थेत
माहीम सबवे पुन्हा एकदा दुरवस्थेत
माहीम सबवे पुन्हा एकदा दुरवस्थेत
See all
MAHIM, Mumbai  -  

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला माहीम सबवे सुरू झाला खरा. पण सध्या झालेली सबवेची दुरवस्था पाहिली तर हा सबवे खरंच नागरिकांच्या सुविधेसाठी बांधण्यात आला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सबवेची स्थिती इतकी दयनीय आहे की याच्या काचांना तडे तर गेले आहेतच पण काही काचा अक्षरश: फुटल्या आहेत.

विशेष म्हणजे पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील याची दखल न घेतल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते इरफान मच्छिवाला यांनी केला आहे. त्यातच पालिकेच्या दुरुस्ती व्यवस्थापन विभागाने दुरुस्तीसाठी वेळ लागणार असल्याचे कारण देत फंड नसल्याचे सांगितल्याचा आरोप मच्छिवाला यांनी केला.


'खरं पाहता पालिकेकडे अशा दुरुस्तीच्या कामासाठी तरतूद नसावी हेच मुळात अयोग्य आहे. जनतेचा पैसा जातो कुठे? लवकरात लवकर या सबवेची दुरूस्ती न झाल्यास पावसाळ्यात सबवेमध्ये पाणी भरण्याची भीती आहे.

- इरफान मच्छिवाला, आरटीआय कार्यकर्ते

Loading Comments