Advertisement

मेट्रो ३ च्या भुयारीकरणाचं ५० टक्के काम पूर्ण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ रेल्वे प्रकल्पाच्या ५० टक्के भुयारीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. विशेष म्हणजे कुठलाही अपघात न होता गेल्या १९ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण झालं आहे.

मेट्रो ३ च्या भुयारीकरणाचं ५० टक्के काम पूर्ण
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ रेल्वे प्रकल्पाच्या ५० टक्के भुयारीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. विशेष म्हणजे कुठलाही अपघात न होता गेल्या १९ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण झालं आहे. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (MMRC)च्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे. 

मेट्रो-३ प्रकल्पाच्या ३३.५ किमीच्या मार्गिकेवर एकूण २८ किमीचं भुयारीकरण करायचं आहे. या भुयारीकरणापैकी निम्म काम पूर्ण झालं. या भुयारीकरणासाठी सप्टेंबर २०१७ मध्ये कृष्णा-१ हे टीबीएम मशीन माहीमच्या नयानगर इथून भूगर्भात उतरवण्यात आलं होतं. तर ६ नोव्हेंबर २०१७ पासून प्रत्यक्ष भुयारीकरणाला सरुवात झाली होती. या कामासाठी एकूण १७ टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) भूगर्भात उतरण्यात आल्या आहेत. 

भुयारीकरणाचा पहिला टप्पा सप्टेंबर २०१८ मध्ये पार पडला. त्यानंतर केवळ ८ महिन्यांत एकूण १२ टप्पे पूर्ण झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-२, दादर, विद्यानगरी आणि विधानभवन इथं प्रत्येकी २, तर सीप्झ, सहार, एमआयडीसी, वरळी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं प्रत्येकी १ अशा एकूण १३ टप्प्यांत हे काम पूर्ण झालं आहे.  

टीबीएस मशिन्स भूर्गभात उतरवण्यासाठी नया नगर, कफ परेड, इरॉस सिनेमा, आझाद मैदान, सायन्स म्युझियम, सिद्धीविनायक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, कलिना विद्यानगरी, पाली मैदान, सारीपुत नगर, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनस टी २ इथं लाॅन्चिंग शाफ्ट बांधण्यात आले आहेत. 

या मार्गिकेवरील उर्वरित ५० टक्के भुयारीकरण आणखी १९ टप्प्यांत पूर्ण होईल.

 


हेही वाचा-

पालिकेच्या १२ कर्मचाऱ्यांना डेंग्यू आणि मलेरियाची लागण

'मेट्रो-३' च्या १.२४ किलोमीटर अंतराचं भुयारीकरण पूर्णRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा