Advertisement

पालिकेच्या १२ कर्मचाऱ्यांना डेंग्यू आणि मलेरियाची लागण

मुंबईतील मंत्रालयाजवळील परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळं महापालिकेच्या १२ कर्मचाऱ्यांना डेंग्यू आणि मलेरियाची लागण झाल्याचं समजतं आहे.

पालिकेच्या १२ कर्मचाऱ्यांना डेंग्यू आणि मलेरियाची लागण
SHARES

मुंबईतील मंत्रालयाजवळील परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळं महापालिकेच्या १२ कर्मचाऱ्यांना डेंग्यू आणि मलेरियाची लागण झाल्याचं समजतं आहे. त्यामुळं महापालिकेनं डेंग्यूंच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ तातडीनं लक्षात घेत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) नोटीस पाठवली आहे.


पालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्रास

मुंबईत मान्सून दाखल होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले असून, १७ जूनपासून विधानसभेत पावसाळी अधिवेशला सुरुवात होणार आहे. मुंबईत मेट्रोचं काम खूपचं गतीनं सुरू आहे. मात्र, मेट्रोच्या कामामुळं पालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्रास होतं आहे. तसंच, या कामामुळं त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो आहे. मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं. या साचलेल्या पाण्यामुळं मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.


एमएमआरडीएला नोटीस

मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यांमधील पाणा साचून लोक आजारी पडत असल्यामुळं पालिकेनं एमएमआरडीएला नोटीस पाठवली आहे. पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबतं. तुंबलेल्या पाण्यामुळं विविध आजारांना मुंबईकरांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारांची मोठ्या प्रमाणात लागण होण्याची शक्यात वर्तवली जात आहे.



हेही वाचा -

नाल्यांसह समुद्राच्या स्वच्छतेसाठी नाल्यांमध्ये ट्रॅश ब्रूम ही यंत्रणा कार्यान्वित

मोनोच्या ताफ्यात दाखल होणार आणखी २ लोकल ?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा