Advertisement

मोनोच्या ताफ्यात दाखल होणार आणखी २ लोकल ?

एमएमआरडीए जून महिन्याचा अखेरीस मोनो रेल्वेच्या ताफ्यात आणखी दोन मोनो रेल्वे दाखल करण्याची शक्यात आहे. सध्यस्थिती या २ मोनो रेल्वेच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे.

मोनोच्या ताफ्यात दाखल होणार आणखी २ लोकल ?
SHARES

मुंबईत सुरू झालेल्या मोनो रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, मोनो रेल्वेच्या सेवेमध्ये सुधारणा करण्याचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (एमएमआरडीए) ठरविलं आहे. अशातचं आता एमएमआरडीए जून महिन्याचा अखेरीस मोनो रेल्वेच्या ताफ्यात आणखी दोन मोनो रेल्वे दाखल करण्याची शक्यात आहे. सध्यस्थिती या २ मोनो रेल्वेच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. मात्र, या दोन मोनो रेल्वे सेवेमध्ये आल्यास प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.


९० टक्के वेळेवर

'आम्ही दोन अतिरिक्त रेकसह मोनो रेल्वेची सेवा वाढवू शकते. परंतु, आमचं लक्ष मोनो रेल्वेची सेवा सुधारण्यावर आहे. सध्या, मोनो रेल्वे ९० टक्के वेळेवर स्थानकात येते. मात्र, निश्चित वेळेतच मोनो रेल्वे स्थानकात पोहचावी यावर आम्ही जास्त लक्ष देत आहोत', असं एमएमआरडीए म्हणणं आहे.

फेऱ्यांची संख्या वाढणार

मोनोरेल्वेच्या वडाळा ते चेंबूर या पहिल्या आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्यावर मोनोरेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्यासाठी एमएमआरडीए आणखी १० मोनो विकत घेणार आहे. सद्यस्थितीत या मार्गावर ४ मोनो धावत आहेत. त्यामुळं या मार्गावरील प्रवाशांना प्रवासासाठी २० ते २५ मिनिटं मोनोची वाट पाहत स्थानकात उभं राहावं लागतं. मात्र, मोनोच्या ताफ्यात आणखी मोनो आल्यास, या फेऱ्यांची संख्या वाढणार आहे.हेही वाचा -

मध्य रेल्वे मार्गावरही बसवणार स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा

२ पूल जमीनदोस्त करण्यासाठी पालिकेचं वाहतूक पोलिसांना पत्रRead this story in हिंदी
संबंधित विषय