Advertisement

२ पूल जमीनदोस्त करण्यासाठी पालिकेचं वाहतूक पोलिसांना पत्र

मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी धारावी आणि शीव येथील पूर्व-पश्चिम जोडणारे दोन पूल जमीनदोस्त केले जाणार आहेत. मात्र, हे पूल जमिनदोस्त करण्यासाठी मुंबई महापालिकेनं वाहतूक पोलिसांना परवानगीसाठी पत्र लिहिलं आहे.

२ पूल जमीनदोस्त करण्यासाठी पालिकेचं वाहतूक पोलिसांना पत्र
SHARES

मुंबईसह उपनगरातील अनेक धोकादायक पूल पालिकेनं वापरासाठी बंद केले आहेत. तर काही पूल वाहतुकीसाठी बंद केले आहेत. आशातच आता आणखी २ पूल जमिनदोस्त करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी धारावी आणि शीव येथील पूर्व-पश्चिम जोडणारे दोन पूल जमीनदोस्त केले जाणार आहेत. मात्र, हे पूल जमिनदोस्त करण्यासाठी मुंबई महापालिकेनं वाहतूक पोलिसांना परवानगीसाठी पत्र लिहिलं आहे. परंतु, आधीच्या पाडलेल्या पूलांमुळं मुंबईत वाहतूककोंडी प्रचंड होत आहे. त्यामुळं या २ पूलांच्या पाडकामाला परवानगी वाहतूक पोलीस देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रवाशांची वर्दळ

धारावी आणि शीव परिसरात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्यानं नेहमीच वाहतूक कोंडीची परिस्थीती निर्माण होते. तसंच, पावसाळाही काही दिवसांवर आल्यामुळं हे २ पूल पाडले तर पावसाळ्यात प्रवाशांच्या या त्रासात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. याआधी मुंबईतील भायखळा येथील हँकॉक आणि लोअर परळचा पूल पाडण्यात आले आहेत. मात्र, या पूलांचं काम खूपचं धिम्यागतीनं सुरू असून, मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण होतं आहे. त्यामुळं ही परिस्थिती लक्षात घेऊन पूल पाडकामाला हिरवा कंदील दिलेला नाही.


पुलाची काम धिम्यानं

धारावी आणि शीव येथील पूल पाडून तेथे दीड वर्षात नवीन पूल उभारण्यात येतील असं पालिकेचं म्हणणं आहे. परंतु, लोअर परळ पूलाच्या आणि इतर पुलाची काम धिम्यानं सुरू आहे. त्यामुळं पालिकेने परवानगीसाठी दोन वेळा पत्र पाठवूनही त्यावर पोलिसांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

मध्य रेल्वे मार्गावरही बसवणार स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा