Advertisement

मेट्रो-६ प्रकल्पाचा भार अाता दिल्ली मेट्रो काॅर्पोरेशनवर


मेट्रो-६ प्रकल्पाचा भार अाता दिल्ली मेट्रो काॅर्पोरेशनवर
SHARES

दहिसर ते डीएननगर 'मेट्रो-२ अ'च्या कामाची जबाबदारी दिल्ली मेट्रो रेल काॅर्पोरेशनवर (डीएमअारसी) टाकल्यानंतर अाता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमअारडीए) मुंबईतील अाणखी एका मेट्रो मार्गाची जबाबदारी डीएमअारसीवर सोपवली अाहे. एमएमअारडीए अाणि डीएमअारसी यांच्यात मंगळवारी करार झाला असून त्यानुसार अाता स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो-६ मार्गाची जबाबदारी डीएमअारसीवर सोपविण्यात अाल्याची माहिती अतिरिक्त महानगर अायुक्त प्रवीण दराडे यांनी दिली.


सर्व कामं डीएमअारसीए करणार

या करारानुसार १४.५ किमी लांबीच्या मेट्रो-६ प्रकल्पाची संपूर्ण अंमलबजावणी डीएमआरसी करणार आहे. प्रकल्पाकरिता सल्लागार नेमण्यापासून बांधकामासाठी निविदा मागवून त्या मंजूर करण्यापर्यंतची सर्व कामं डीएमआरसीच्या माध्यमातून राबवली जाणार आहेत. प्रकल्पासाठी यंत्रणा खरेदी करण्यासाठीच्या निविदा मागवण्याचं कामही डीएमआरसीचं असल्याचं दराडे यांनी स्पष्ट केलं.


कांजूरमार्ग इथं कारडेपो

मेट्रो-६ प्रकल्प ५ हजार ४९० कोटींचा असून या संपूर्ण मार्गात एकूण १३ स्थानकं आहेत. या प्रकल्पासाठी कांजूरमार्ग इथं कारडेपो उभारण्यात येणार आहे. दरम्यान, हा मार्ग सेवेत दाखल झाल्यास पश्चिम उपनगरं आणि पूर्व उपनगरं एकमेकांशी जोडली जाणार असून प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा