Advertisement

खूशखबर! म्हाडाची राज्यभरात १४,६२१ घरांसाठी सोडत

म्हाडा प्राधिकरणाने राज्यभरात १४ हजार ६२१ घरांसाठी सोडत काढणार असल्याची घोषणा मंगळवारी केली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी ही घोषणा झाल्याने इच्छुक गृहखरेदीदार सुखावले आहेत.

खूशखबर! म्हाडाची राज्यभरात १४,६२१ घरांसाठी सोडत
SHARES

म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या गृहखरेदीदारांसाठी खूशखबर आहे. म्हाडा प्राधिकरणाने राज्यभरात १४ हजार ६२१ घरांसाठी सोडत काढणार असल्याची घोषणा मंगळवारी केली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी ही घोषणा झाल्याने इच्छुक गृहखरेदीदार सुखावले आहेत.    

म्हाडा प्राधिकरणाच्या वांद्रे येथील मुख्यालयात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी राज्यभरातील विविध मंडळांतील घरांसाठी सोडत जाहीर केली. यावेळी म्हाडाचे मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण, कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील देखील उपस्थित होते. 

कुठे घरे?

म्हाडा प्राधिकरणाकडून औरंगाबादमध्ये १४२, नाशिकमध्ये ९२, कोकणात ५३००, नागपूरमध्ये ८९१, पुण्यात २००० आणि अमरावतीमध्ये १२०० घरे बांधण्यात येणार आहेत. 

गिरणी कामगारांसाठी घरे

याशिवाय मुंबईत गिरणी कामगारांच्या घरासाठी ५०९० घरांची लॉटरी काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. गिरणी कामागारांव्यतिरिक्त मुंबईत इतर कुठल्याही गृहप्रकल्पाची घोषणा म्हाडाकडून करण्यात आलेली नाही.  

म्हाडा वसाहत पुनर्वसनाचा अहवाल

म्हाडाच्या मुंबईतील ५६ वसाहतींच्या पुनर्विकासासाठी कोणतं धोरण राबवावं, रहिवाशांना कुठले लाभ द्यावेत, कॉपर्स फंडची सुविधा आदींविषयी निर्णय घेण्यासाठी मधु चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. सोबत सेवाशुल्काचा प्रश्न सोडवण्यासाठीही समिती नेमली आहे. या दोन्ही समित्यांचा अहवाल अनुक्रमे सुमारे १५ आणि ८ दिवसांत सादर होईल. त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.

 


हेही वाचा-

म्हाडाची मास्टर लिस्ट आता आॅनलाइन, रहिवाशांची फसवणूक थांबवणार

गिरणी कामगारांना बेलापूर, उरणमध्ये घरं द्यावी, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा अजब सल्लाRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा