Advertisement

गिरणी कामगारांना बेलापूर, उरणमध्ये घरं द्यावी, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा अजब सल्ला

गिरणी कामगारांना नवी मुंबई, उरण, बेलापूर भागातील नैना गृहप्रकल्पात घरे देण्यात यावी, अशी सुचना गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.

गिरणी कामगारांना बेलापूर, उरणमध्ये घरं द्यावी, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा अजब सल्ला
SHARES

गिरणी कामगारांना नवी मुंबई, उरण, बेलापूर भागातील नैना गृहप्रकल्पात घरे देण्यात यावी, अशी सुचना गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. 'म्हाडा हा विश्वासार्ह ब्रँड आहे. लोकांचा म्हाडावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळं म्हाडानं मुंबई महानगर प्रदेशात परवडणारी घरे बांधावी’, असंही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हाडाच्या बैठकीत विखे म्हटलं.

अधिकाधिक घरे बांधणे 

गिरणी कामगारांच्या घरांबाबतही अजब सल्ला देतानाच, मुंबईत म्हाडाच्या सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना अधिक गतिमान करावं. म्हाडाकडं असलेल्या मुंबईतील ५६ वसाहतींमधून अधिकाधिक घरे उभे करणे सुरूच राहील. मात्र आता त्यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळंच आता परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडानं मुंबईबाहेर जावं. तसंच ग्रामीण क्षेत्रात घरे बांधण्यास प्रधान्य द्यावं', अशा सूचना विखे पाटील यांनी केल्या.

अनेकांची उपस्थिती

या बैठकीला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, म्हाडा मंडळाचे सभापती मधू चव्हाण, विनोद घोसाळकर, बाळासाहेब पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी दीपेंद्रसिंह खुशवाह, दिनकर जगदाळे, शिवशाही पुनर्वसन कंपनीच्या संचालक डॉ. निधी पांड्ये आदी अधिकारी उपस्थित होते.



हेही वाचा -

फेसबुकवर अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या डमी आणि खोट्या अकाऊंटवर कारवाई करा- नीलम गोऱ्हे

मुंबईत अवैध पार्किंग केल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंड



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा