फेसबुकवर अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या खोट्या अकाऊंटवर कारवाई करा- नीलम गोऱ्हे

केतकी चितळेला फेसबुकवर अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या डमी आणि खोट्या अकाऊंटवर कडक कारवाई करण्यात यावी तसंच, आयटी ऍक्टबाबत राज्य सरकारनं पावलं उचलावीत अशी मागणी शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे.

फेसबुकवर अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या खोट्या अकाऊंटवर कारवाई करा- नीलम गोऱ्हे
SHARES

'तुझं माझं ब्रेक अप' या मालिकेतील अभिनेत्री केतकी चितळे हिच्या हिंदीमधील व्हिडिओ अश्लील प्रतिक्रिया करणाऱ्यांवर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. तर केतकीला फेसबुकवर अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या डमी आणि खोट्या अकाऊंटवर कडक कारवाई करण्यात यावी तसंच, आयटी ऍक्टबाबत राज्य सरकारनं पावलं उचलावीत अशी मागणी शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे.

अश्लील प्रतिक्रिया

हिंदीमधील व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केतकीच्या या व्हिडीओवर अनेकांनी अश्लील प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळं केतकीनं मंगळवारी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, अभिनेते सुशांत शेलार, दिगंबर नाईक, प्रकाश वालावलकर यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

स्वतंत्र कायदा

सोशल मीडियावर मते पटत नसल्यामुळं अगदी खालच्या पातळीवर जाऊन विरोध केला जात आहे. हे करताना संयम, विवेक, सुसंस्कृतता यासोबतच कायदेशीर जबाबदारीचं भान अनेकवेळा सुटलेलं दिसत आहे. अश्लील शिव्या, अगदी बलात्काराची भाषा वापरली जात आहे. आयटी कलम ६६ () सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यामुळं अश्लील भाषेत ट्रोलिंग करणाऱ्याचं फावलं आहे. त्यामुळं आयटी कायद्यात महाराष्ट्र सरकारनं स्वतंत्र कायदा तयार करता येईल का, याबाबत माहिती घ्यावी असं गोऱ्हे यांनी म्हटलं.

नेत्यांनाही करतात ट्रोल

ट्रोलिंगचा अनुभव फक्त कलाकार किंवा महिलांना येत नसून विविध पक्षातील नेत्यांना येत असल्याचं देखील सभागृहातील सदस्यांनी सांगितलं. याबाबत विविध उपाययोजना करण्यासाठी बैठक घेऊन आमदार, कायदेतज्ञ आणि आयटीतज्ञ यांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सभापतींनी दिले आहेत.



हेही वाचा -

पश्चिम रेल्वेच्या मालाड, मुंबई सेंट्रल येथील पूल बंद

‘मरे’ रोजच विस्कळीत, संतप्त प्रवाशांनी दिला अल्टिमेटम



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा