पश्चिम रेल्वेच्या मालाड, मुंबई सेंट्रल येथील पूल बंद

मालाड आणि मुंबई सेंट्रल स्थानकातील धोकादायक स्थितीत असलेले पूल दुरूस्तीच्या कामासाठी बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे.

SHARE

मालाड आणि मुंबई सेंट्रल स्थानकातील धोकादायक स्थितीत असलेले पूल बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. मालाड स्थानकातील पूल शुक्रवार २१ जून आणि मुंबई सेंट्रल स्थानकातील पूल शनिवार २२ जून पासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांची मोठी गैर सोय होण्याची शक्यता आहे.

दुरुस्तीसाठी बंद

मालाड स्थानकातील दक्षिण दिशेकडील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामळं प्रवाशांना पूल दुरुस्त होईपर्यंत स्थानकाच्या मध्यभागी आणि उत्तर दिशेकडील असलेल्या पूलाचा वापर करावा लागणार आहे. या पूलाजवळील नवीन पूलाचं काम अद्याप पूर्ण झालेले नसल्यानं ऐन पावसाळ्यात वापरात असलेला पूल बंद करण्यात केल्यानं प्रवाशांना स्थानकावर गर्दीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

मुंबई सेंट्रल स्थानकातील उन्नत तिकिटविक्री केंद्राजवळील पादचारी पूलाच्या उत्तर दिशेकडील पायऱ्या दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात येणार आहे. दुरुस्तीचं काम सुरू असेपर्यंत पूल प्रवासी वापरासाठी बंद राहणार आहे. या काळात प्रवाशांनी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर उतरणाऱ्या पायऱ्यांचा वापर करावा, असं आवाहन पश्चिम रेल्वेनं केलं आहे.हेही वाचा -

‘मरे’ रोजच विस्कळीत, संतप्त प्रवाशांनी दिला अल्टिमेटम

‘एक देश, एक निवडणूक’ला कॉग्रेसचा बहिष्कार; मात्र मिलिंद देवरांचा पाठिंबासंबंधित विषय
ताज्या बातम्या