Advertisement

‘मरे’ रोजच विस्कळीत, संतप्त प्रवाशांनी दिला अल्टिमेटम

मध्य रेल्वेची वाहतूक ४० ते ४५ मिनिटं उशिरानं धावत असून प्रवाशांना दररोज लेट मार्कचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळं संतापलेल्या प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना (डीआरएम) भेटून १० दिवसांचा 'अल्टिमेटम' दिला आहे.

‘मरे’ रोजच विस्कळीत, संतप्त प्रवाशांनी दिला अल्टिमेटम
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक मागील अनेक दिवसांपासून सतत विस्कळीत होत आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड, रुळाला तडा, ओव्हरहेट वायर तुटणे यांसारख्या विविध कारणांमुळं मध्य रेल्वेची वाहतूक ४० ते ४५ मिनिटं उशिरानं धावत असून प्रवाशांना दररोज लेट मार्कचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळं संतापलेल्या प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना (डीआरएम) भेटून १० दिवसांचा 'अल्टिमेटम' दिला आहे.

रोजच लेट मार्क

टिटवाळ्याचे रहिवासी शेखर कापुरे यांनी गुरुवारी आपल्या सहप्रवाशांसह मध्य रेल्वेला अल्टिमेटम दिला आहे. मध्य रेल्वेमुळं रोजच लेट मार्क लागत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यामुळं १० दिवसांत या नोटिशीला उत्तर न दिल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.


उत्तराकडे लक्ष

मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळं याआधीही प्रवाशांनी 'रेल रोको' करून आपला संताप व्यक्त केला होता. त्यावेळी काही दिवस लोकल वेळेत धावल्या होत्या. मात्र, पुन्हा मध्य रेल्वे सतत विस्कळीत होत आहे. त्यामुळं आता प्रवाशांनी दिलेल्या नोटीसला रेल्वे प्रशासन १० दिवसांत काय उत्तर देणार याकडं सर्व प्रवाशांचं लक्ष लागून राहिलं आहे.हेही वाचा -

‘एक देश, एक निवडणूक’ला कॉग्रेसचा बहिष्कार; मात्र मिलिंद देवरांचा पाठिंबा

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सुनावणीची रेकॉर्डिंग होणार नाहीRead this story in English
संबंधित विषय