Advertisement

धोकादायक इमारतींची यादी येण्यास उशीर

पावसाळा सुरू होण्याआधी म्हाडातर्फे मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी प्रसिद्ध केली जाते. परंतु यंदा म्हाडाचे अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने ही यादी येण्यास उशीर होणार आहे.

धोकादायक इमारतींची यादी येण्यास उशीर
SHARES

पावसाळा सुरू होण्याआधी म्हाडातर्फे मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी प्रसिद्ध केली जाते. परंतु यंदा म्हाडाचे अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने ही यादी येण्यास उशीर होणार आहे. उपकरप्राप्त इमारतींच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या  म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळा (MRRB) तर्फे ही यादी तयार करण्यात येते.

म्हाडातील बहुसंख्य कर्मचारी निवडणुकीदरम्यान व्यस्त असल्याने शहरातील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींची यादी करण्यास उशीर झाल्याचं मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनीही मान्य केलं. तसंच लवकरात लवकर यादी प्रसिद्ध करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. 

त्वरीत दुरूस्तीची गरज

जुन्‍या मोडकळीस आलेल्‍या भाडेतत्‍वावरील इमारतींना दुरुस्‍ती उपकर लागू करण्यात आल्याने या इमारतींना 'उपकरप्राप्‍त इमारती ' असं म्हटलं जातं. अशा १६ हजार इमारतींची जबाबदारी म्हाडावर आहे. यातील बहुसंख्य इमारती दक्षिण मुंबईत असून त्यातील ८ हजार इमारतींना त्वरीत दुरूस्तीची गरज आहे. तर ३ हजार इमारती मोडकळीस आल्या आहेत. १०० वर्षे वयोमानाच्या इमारती बांबूचे टेकू लावून उभ्या आहेत. म्हाडातर्फे पावसाळ्याआधी या इमारतींचं सर्वेक्षण करण्यात येतं. इमारत खाली करण्यासाठी रहिवाशांना नोटीसही बजावण्यात येते. मात्र संक्रमण शिबिरातील असुविधांमुळे या इमारतींतील हजारो कुटुंब जीव मुठीत घेऊन राहतात.  

लहान-मोठे अपघात

मंडळाच्या आकडेवारीनुसार, १९७०-७१ ते २०१७-१८ या काळात मुंबईत इमारतींचे ३ हजार ५२८ लहान मोठे अपघात झाले. यात ८९४ नागरिकांचा मृत्यू झाला, तर १ हजार ८८३ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. २०१७ मध्ये भेंडी बाजारमधील हुसेनी इमारत कोसळून त्यात ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. 



हेही वाचा-

३ टप्प्यांत होणार मोतीलाल नगर पुनर्विकास योजनेचं सादरीकरण

बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेला वेग, २५६ रहिवाशांची करारपत्रावर स्वाक्षरी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा