बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेला वेग, २५६ रहिवाशांची करारपत्रावर स्वाक्षरी

२५६ पैकी १३० रहिवाशांनी ना. म. जोशी मार्गावरील साइट आॅफिसला भेट देऊन करारपत्राची आॅनलाइन नोंदणी देखील केली आहे.

  • बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेला वेग, २५६ रहिवाशांची करारपत्रावर स्वाक्षरी
SHARE

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत २५६ रहिवाशांनी म्हाडाच्या करारावर सह्या केल्या आहेत. २५६ पैकी १३० रहिवाशांनी ना. म. जोशी मार्गावरील साइट आॅफिसला भेट देऊन करारपत्राची आॅनलाइन नोंदणी देखील केली आहे. म्हाडासाठी ही मोठी दिलासादायक बाब म्हटली जात आहे. 

पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात ८०० पैकी ४५१ रहिवासी पात्र ठरले असून ३४९ रहिवाशांची पात्रता प्रक्रिया अद्याप सुरू आहे. या ४५१ पात्र रहिवाशांसोबत नोंदणीकृत करार झाल्यानंतर त्यांना संक्रमण शिबिरात पाठवण्यात येईल. 

 ना. म. जोशी मार्ग येथील एकूण ३२ इमारतींपैकी पहिल्या टप्प्यात ७ इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. करार पूर्ण झालेल्या ४०० हून अधिक पात्र रहिवाशांना सध्या रहात असलेल्या घराच्या २ किमी परिसरातील संक्रमण शिबिरात हलवण्यात येणार आहे. म्हाडाकडून करारपत्राची प्रत मिळणात ही प्रक्रिया सुरू केली जाईल. इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यावर या रहिवाशांना २ बीएचकेचं घर मिळणार आहे.  

  • ३२ इमारती
  • २,५६० रहिवासी
  • २४६० कोटी  + निधी
  • निविदा- शापूरजी पालोनजीहेही वाचा-

बीडीडीवासीयांची नाराजी म्हाडाकडून दूर, १२५ हून अधिक रहिवाशांचा संक्रमण शिबिरात जाण्यास होकारसंबंधित विषय
ताज्या बातम्या