Advertisement

मित्र-म्हाडा अॅप सुरू


मित्र-म्हाडा अॅप सुरू
SHARES

काळाबरोबर म्हाडाही तंत्रज्ञानाच्यादृष्टीनं विकसित होत आहे. म्हाडाचा कारभार शक्य तितका आॅनलाईन करण्याचा प्रयत्न म्हाडानं केला असून आॅनलाईन-लाॅटरीचा पाया म्हाडानं रचला आहे. म्हाडाबाबतची प्रत्येक माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. यापुढं जात तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं आणखी मजबूत होण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. त्यातूनच म्हाडानं आपल्या वेबसाईटचं रूपडं पालट असून 'मित्र-म्हाडा' अॅप देखील सुरू केलं आहे. या अॅपमुळं लाॅटरी विजेत्यांना आणि रहिवाशांना म्हाडा भवनाच्या फेऱ्या मारण्याची गरज लागणार नाही.


अॅपचं अनावरण

'इनिशिएटिव्ह फाॅर ट्रान्सपरंट अॅण्ड रिस्पाॅन्सिव्ह अॅक्शन' या नावानं बनवण्यात आलेलं हे मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल प्ले स्टोअरवरून MITRA_MHADA असं आॅपरेट करून तसंच https://play.google.com/store/apps/details?id=mhada.mitra या थेट लिंकवरूनही डाऊनलोड करता येणार आहे. या अॅपचं बुधवारी म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.


सर्व माहिती हाती

म्हाडा लाॅटरी, लाॅटरीतील विजेते, म्हाडा वसाहतीतील रहिवाशी आणि उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशी या सर्वांसाठी म्हाडाचा मित्र कक्ष महत्त्वाचा आहे. मित्र कक्षातून हवी ती माहिती या सर्वांना मिळत असते. अशातच आता अॅप आल्यानं हातात मोबाईलवर माहिती उपलब्ध होणार आहे.


वेबसाईटचं नव्याने अनावरण

सोबतच म्हाडाच्या वेबसाईटचं नव्याने आनावरणही बुधवारी करण्यात आलं. या वेबसाईटची रचना अधिक आकर्षक आणि झटपट, सहजरितीनं माहिती मिळेल, अशी करण्यात आली आहे. म्हाडातील सर्व प्रणालीच्या लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतर अनेक नव्या गोष्टी नव्या वेबसाईटच्या आणि अॅपच्या माध्यमातून करण्यात आल्याने त्याचा फायदा विजेते-रहिवाशांना होईल, असा दावा म्हाडाकडून करण्यात आला आहे.



हेही वाचा-

गुडन्यूज! म्हाडाची सर्व गटातील घरं होणार स्वस्त!!

उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासासाठी ५१ टक्के रहिवाशांची संमती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा