पार्किंग सुरू आणि तेही मोफत

वांद्रे - जी ब्लॉकमधील पार्किंग पुन्हा सुरू झाली आहे आणि तीही मोफत. धक्का बसला असेल ना. पण हे खरं आहे. बीकेसी पार्किंग इश्यू ग्रुपने सतत पाठपुरावा केल्यानं आणि ‘मुंबई लाईव्ह'नं बातमी दाखवल्यानंतर एमएमआरडीएला 24 तासांत हा निर्णय घ्यावा लागलाय. त्यामुळे 'कर लो पार्किंग मुठ्ठी मे' हे रिलायन्स जियो गार्डनचं स्वप्न तूर्तास तरी स्वप्नचं राहिलं आहे.

तीनदा निविदा काढूनही कंत्राटदार मिळत नसल्यानं एमएमआरडीएनं जी ब्लाँकमधील तीन पार्किंग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पार्किंग बंद करू नये यासाठी वारंवार एमएमआरडीएला साकडं घालूनही एमएमआरडीएकडून दाद न मिळाल्यानं बीकेसी पार्किंग इश्यू ग्रुपने ‘मुंबई लाईव्ह’कडे धाव घेतली. त्यानुसार यासंबंधीचे सविस्तर वृत्त ‘मुंबई लाईव्ह’नं गुरूवारी प्रसिद्ध केल्यानंतर एमएमआरडीएला खडबडून जाग आली आणि तीनपैकी दोन पार्किंग सुरू केली.

12 दिवसांकरता का होईना, पण आता पार्किंग सुरू झाल्यानं आणि त्यातही मोफत पार्किंग मिळाल्यानं बीकेसी पार्किंग इश्यू ग्रुप आणि बीकेसीतील वाहनचालक खूश आहेत. त्यांनी 'मुंबई लाईव्ह'चं भरभरून कौतूक केलंय. आता पार्किंगचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा अशीच आशा या ग्रुपकडून केली जात आहे.

Loading Comments