Advertisement

मुंबईतील काॅन्टेमेंट झोनला देणार रेड, आॅरेंज, ब्ल्यू रंग

आता मुंबईतील कोरोनाग्रस्तांवर नजर ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून प्रत्येक काॅन्टेमेंट झोनला देखील रंग देण्यात येणार आहे.

मुंबईतील काॅन्टेमेंट झोनला देणार रेड, आॅरेंज, ब्ल्यू रंग
SHARES

केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार प्रत्येक जिल्ह्याला रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे आता मुंबईतील कोरोनाग्रस्तांवर नजर ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून प्रत्येक काॅन्टेमेंट झोनला देखील रंग देण्यात येणार आहे.

राज्यात बुधवारी ४३१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने महाराष्ट्रातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या आता ५६४९ वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण वाढून ३६८३ एवढे झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाला सातत्याने या स्थितीवर लक्ष ठेवावं लागत आहे. 

कोरोनाबाधिताच्या वाढत्या संख्येसोबतच मुंबईतील काॅन्टेमेंट झोनची संख्याही वाढू लागली आहे. मंगळवारपर्यंत मुंबईत ७२१ काॅन्टेमेंट झोन होते, ते वाढून बुधवारपर्यंत ८१७ वर जाऊन पोहोचले आहेत. काॅन्टेमेंट झोन पूर्णपणे सील करण्यात येऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तिथं प्रशासनाकडून विशेष उपााययोजना केल्या जात आहेत. त्या दृष्टीकोनातून काॅन्टेमेंट झोनला रंगात विभागण्याचं मुंबई महापालिकेने ठरवलं आहे. 

हेही वाचा - राज्यातील ६४ पोलिसांना कोरोनाची लागण, ३४ पोलीस मुंबईतले

त्यासाठी रेड, आॅरेंज आणि ब्ल्यू असे तीन रंग निवडण्यात आले आहेत. अत्यंत दाटीवाटीचा परिसर जिथं मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. अशा ठिकाणाला रेड झोन म्हणून दाखवण्यात येईल. दाटीवाटीचं परंतु रेड झोनच्या तुलनेत कमी कोरोनाबाधित असलेलं तसंच रुग्णांची संख्या कमी होत असलेलं ठिकाण आॅरेंज रंगात दाखवण्यात येईल. तर ब्ल्यू रंग हा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या इमारतींसाठी वापरण्यात येईल, इमारतींसाठी वेगळी उपाययोजना करण्यात येईल.

यासंबंधी बोलताना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येकडे पाहता सध्याच्या स्थितीत काॅन्टेमेंट झोनची विभागणी करणं खूप गरजेचं झालं आहे. जेणेकरून संबंधित ठिकाणी किती पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची हे ठरवता येईल. रेड झोनच्या ठिकाणी कडक उपाययोजना आणि गस्त घालण्याची गरज आहे.

तर दाटीवाटीच्या वस्तीत कोरोनाला आळा घालण्यासाठी येत असलेल्या आव्हानांबाबत बोलताना गोरेगाव येथील नगरसेवक संदीप पटेल म्हणाले की, झोपडपट्ट्यांमध्ये अत्यंत दाटीवाटीने लोकं राहातात. याठिकाणी हात आणि तोंडाद्वारे कोरोनाचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे. घरात राहिलो तर भूखेने तडफडून मरू, या भीतीने लाॅकडाऊनमुळे त्रस्त झालेले लोकं कामाधंद्यासाठी घरातून बाहेर पडत आहेत. अशा लोकांची समजून घालून त्यांना घरात बसायला लावणं खूप आव्हानात्मक काम आहे.

हेही वाचा - पालघरमध्ये चोर समजून तिघांची दगडानं ठेचून हत्या


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा