Advertisement

हँकॉक ब्रिजच्या दोन लेन ‘या’ तारखेला सुरू होण्याची शक्यता

148 वर्षे जुनी ब्रिटिशकालीन संरचना जीर्ण घोषित केल्यानंतर 2016 मध्ये पाडण्यात आली. हे सँडहर्स्ट रोड आणि भायखळा दरम्यान आहे.

हँकॉक ब्रिजच्या दोन लेन ‘या’ तारखेला सुरू होण्याची शक्यता
(File Image)
SHARES

गेल्या तब्बल चार वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या हँकॉक ब्रिजच्या दोन लेन 14  किंवा १५ जून रोजी उघडण्याची शक्यता आहे. या ब्रिजवरून वाहतूक सुरू झाल्यानंतर हजारो वाहनचालक, नागरिक-रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हँकॉक पूल सुरू करण्याची मुदत अनेकवेळा वाढवण्यात आली आहे. तथापि, ताज्या अहवालानुसार असे समोर आले आहे की पुलाच्या दोन लेन 15 जून रोजी उघडल्या जातील.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्याने सांगितले की दोन लेनसाठी अप्रोच रोडचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे, म्हणून 14 किंवा 15 जूनमध्ये दोन्ही मार्ग उघडण्याची योजना आहे.

शिवाय, पहिल्या मुदतीनंतर दोन वर्षांपासून काम सुरू असलेल्या हँकॉक पुलावर कारनॅक पुलाचे काम अवलंबून आहे.

दरम्यान, दक्षिण मुंबईच्या मुख्य पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीपैकी केवळ दोन लेनचे उद्घाटन झाल्याने स्थानिक रहिवासी खूश नाहीत.

प्रस्तावित चार पदरी पुलाचे केवळ दोन मार्गिका सुरू केल्याने पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले.

हॅन्कॉक पुलासाठी पहिला गर्डर जुलै 2020 मध्ये लाँच करण्यात आला. जानेवारी 2021 मध्ये, तो फक्त पादचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यात दुसरा गर्डर टाकण्याचे कामही पूर्ण झाले.

यापूर्वी पालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकल्याने या पुलाचे बांधकाम जवळपास दोन वर्षे रखडले होते. त्यानंतर नव्याने निविदा काढण्यात आल्या आणि फेब्रुवारी 2018 मध्ये कंत्राट देण्यात आले. हे काम वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षित होते.

माझगाव-सँडहर्स्ट रोडदरम्यान असणारा ब्रिटिशकालीन आणि 141 वर्षे जुना हँकॉक पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्यामुळे जानेवारी 2016 मध्ये पाडण्यात आला. पुलाचे काम सुरू झाल्यानंतर रुळाखाली पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीसह अनेक प्रकारच्या युटिलिटीज गेल्याचे समोर आले. या ठिकाणी झोपडपट्टीही होती. त्यामुळे प्रत्यक्ष काम 2021 मध्ये सुरू करण्यात आले.

मात्र या अवाढव्य पुलाचे बांधकाम गेली चार वर्षे रखडले होते. मात्र पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्यामुळे प्रवासी, नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी स्थानिक आमदार यामिनी जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला.



हेही वाचा

दिवाळीत म्हाडाच्या 3 हजार घरांची सोडत, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

वर्सोवा-वांद्रे सीलिंकचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा