Advertisement

दिवाळीत म्हाडाच्या 3 हजार घरांची सोडत, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

म्हाडाकडून मुंबईकरांना मोठं दिवाळी गिफ्ट मिळणार आहे.

दिवाळीत म्हाडाच्या 3 हजार घरांची सोडत, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
SHARES

म्हाडाकडून मुंबईकरांना मोठं दिवाळी (mhada lottery 2022) गिफ्ट मिळणार आहे. दिवाळीत म्हाडच्या (Mhada Lottery) तब्बल 3 हजार घरांची सोडत निघणार आहे. जितेंद्र आव्हाड (mhada lottery 2022 mumbai) यांनी आजच ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचं अनेकाचं स्पप्न पूर्ण होणार आहे.

पहाडी गोरेगाव,मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली जाणार आहे. लवकरच हे काम पुर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील यावेळी म्हाडाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल, असे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वीच म्हाडाने उत्पादन मर्यादाही वाढवली आहे. त्यामुळे यावेळी जास्त पैसे भरण्याची तयारी मात्र ठेवावी लागणार आहे.

अत्यल्प गटासाठी आता वार्षिक 6 लाख तर अल्प गटासाठी 6 लाख ते 9 लाख रुपये, मध्यम गटासाठी 9 ते 12 आणि उच्च गटासाठी 12 ते 18 रुपये अशी मर्यादा करण्यात आली आहे.

उत्पन्न गटानुसार सोडतीतील घरांच्या अनुज्ञेय क्षेत्रफळातही बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार आता अत्यल्प गटातील घरांसाठी 30 चौ.मी., अल्प गटातील घरांसाठी 60 चौ.मी.पर्यंत, मध्यम गटातील घरांसाठी 160 चौ.मी. आणि उच्च गटासाठी 200 चौ.मी. असं क्षेत्रफळ यापुढे लागू असेल.

म्हाडा सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च असे उत्पन्न गट आहेत. या उत्पन्न गटासाठी विशिष्ट उत्पन्न मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. उत्पन्न मर्यादेनुसारच अर्ज भरणं अत्यंत आवश्यक असते. या उत्पन्न मर्यादेनुसार इच्छुकांना सोडतीत घरासाठी अर्ज भरावे लागतात.



हेही वाचा

म्हाडा सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत बदल, 'इतकी' मर्यादा निश्चित

म्हाडाची जूनमध्ये 1200 घरांची लॉटरी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा