Advertisement

मुंबईत २२-२३ डिसेंबरला पाणी कपात

मुंबईत २२ डिसेंबर सकाळी १० वाजल्यापासून ते २३ डिसेंबर सकाळी १० वाजेपर्यंत पाणी कपात होणार आहे. घाटकोपर आणि कुर्ल्यातील काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.

मुंबईत २२-२३ डिसेंबरला पाणी कपात
Representational Image)
SHARES

मुंबईत २२ डिसेंबर सकाळी १० वाजल्यापासून ते २३ डिसेंबर सकाळी १० वाजेपर्यंत पाणी कपात होणार आहे. घाटकोपर आणि कुर्ल्यातील काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. काही भागात १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे. 

घाटकोपर उच्चस्तर जलाशयातील कप्पा-१ ला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील १४०० मि.मी. व्यासाची झडप बसविण्याचे काम २२ डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार असून ते २३ डिसेंबर रोजी सकाळी १० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे २४ तासांसाठी मुंबईत 15 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. तर घाटकोपर, कुर्ल्यात २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 

कुर्ला, घाटकोपरमध्ये या ठिकाणी पाणी नाही 

एल विभाग – प्रभाग क्रमांक १५६, १५८, १५९, १६०, १६१, १६४ मधील संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदीर मार्ग, कुलकर्णी वाडी, सरदारवाडी, डिसूझा कंपाऊंड, अय्यप्पा मंदीर मार्ग, मोहिली पाईपलाइन, लोयलका परिसर, परेरावाडी, इंद्र मार्केट, भानुशाली वाडी, असल्फा गाव, एन.एस.एस. मार्ग, नारायण नगर, साने गुरुजी पंपिंग, हिल नंबर ३, भीम नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी, वाल्मिकी मार्ग, नुराणी मस्जिद, मुकुंद कंपाऊंड, संजय नगर, समता नगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा