Advertisement

मुंबईत लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारणार

या महाविद्यालयात लता मंगेशकर यांच्या नावाने याच महाविद्यालयात मोठे संग्रहालय उभे केले जाणार असल्याचं ही त्यांनी नमूद केले.

मुंबईत लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारणार
SHARES

मास्टर दिनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयाऐवजी आता मुंबईत भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर संगीत या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे,अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

बुधवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी घोषणा केली. त्याचप्रमाणे या महाविद्यालयात लता मंगेशकर यांच्या नावाने याच महाविद्यालयात मोठे संग्रहालय उभे केले जाणार असल्याचं ही त्यांनी नमूद केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.

मास्टर दिनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी ज्येष्ठ संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने मुंबई विद्यापीठात संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचा अहवाल दिला होता. मात्र, दूर्दैवाने मुंबई विद्यापीठातील जागा या महाविद्यालयाला मिळू शकली नाही.

विद्यापीठाजवळील तंत्र शिक्षण विभागाची ३ एकर जागा या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समितीने केलेल्या सूचनेनुसार महाविद्यालयाचे नाव बदलण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांना ७० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मिळालेल्या वस्तू त्यांच्या कुटुंबियांनी जतन करून ठेवल्या आहेत. त्या वस्तू ठेवण्यासाठी याच महाविद्यालयात भव्य संग्रहालय उभारले जाणार आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक बोलीभाषेतील गाणे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर गायल्या जाणा-या गाण्याचा अभ्यास या संगीत महाविद्यालयात करता यावा,अशी लता मंगेशकर यांनी इच्छा होती. त्यानुसार शासनातर्फे लवकरच महाविद्यालय भारणीचे काम केले जाणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा