मुंबई (mumbai) करांना म्हाडा (mhada) च्या घरांसाठी (home) आता एक ते दीड वर्ष वाट पहावी लागणार आहे. मागील काही वर्षांपासून म्हाडाकडील गृहसाठा घटला आहे. म्हाडाला मोकळ्या भूखंडाची कमतरता भासत आहे. त्यामुळे घरांच्या सोडती कमी झाल्या आहेत. आगामी काळात हाती असलेल्या प्रकल्पांतून जास्तीत जास्त घरे उपलब्ध करून देण्यावर म्हाडाचा भर आहे. एक ते दीड वर्षांनंतर १,००० ते १,२०० घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हाडा घरांची लाॅटरी (Lottery) काढेल.
घरांच्या सोडतीचे प्रमाण कमी झाल्यामुळे हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांतून घरं (home) उपलब्ध करून देण्याची तयारी म्हाडा (mhada) ने चालवली आहे. धारावीतील सेक्टर पाचमधील पुनर्विकासासह इतर योजनांमधून म्हाडास एक ते दीड वर्षांत घरे उपलब्ध होतील, असा विश्वास म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण (madhu chavan) यांनी सोमवारी व्यक्त केला. म्हाडा पत्रकार संघाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त म्हाडाच्या वांद्रे (bandra) येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.
म्हाडा (mhada) वसाहतींच्या पुनर्विकासासाठी वित्तसंस्थांकडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. तसंच राज्य सरकारकडून जुन्या उपकरप्राप्त इमारती आणि पंतप्रधान आवास योजना (Prime Minister Housing Scheme) प्रकल्पांसाठी लक्ष पुरविण्यात येणार आहे. त्यातूनच पीएमपीजी प्रकल्पातील ६६ इमारतींचा पुनर्विकास शक्य असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.
हेही वाचा -