Advertisement

ताडदेवमध्ये 'इथे' बनवण्यात आले थीमॅटिक पार्क

पार्क बनवण्यात आलेली जमीन गेली अनेक वर्ष पडिक होती.

ताडदेवमध्ये 'इथे' बनवण्यात आले थीमॅटिक पार्क
SHARES

मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नं दक्षिण मुंबईतील ताडदेव जंक्शनच्या मध्यभागी असलेल्या खुल्या जागेवर थीमॅटिक पार्क बनवले आहे. ही जमीन गेली अनेक वर्ष पडिक होती. पालिकेनं हे थीमॅटिक पार्क बनवण्याची सुरुवात जुलै २०२१ मध्ये केली आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये बांधकाम पूर्ण झाले.

बेंच आणि इतर फर्निचर बसवण्याबरोबरच लँडस्केपिंगची कामेही करण्यात आली असून बागेत पाण्याचे कारंजेही बसवण्यात आले आहेत. उद्यानाच्या मध्यभागी एक तलाव आणि अॅम्फी थिएटरही बांधण्यात आले आहे. हे अॅम्फी थिएटरचे ताडदेवी मंदिराच्या पवित्र कुंडाशी साम्य असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

प्रकल्प पूर्ण होण्यास आठ महिने लागले आणि पालिकेनं १.०५ कोटी खर्च केले. त्यापैकी ९७ लाख बांधकाम कामांवर आणि सुमारे ८ लाख विद्युत कामांवर खर्च करण्यात आले.

उद्यानाच्या देखभालीसाठी स्थानिक रहिवासी कल्याणकारी संघटना आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांची मदत घेतली जाऊ शकते, असे गायकवाड म्हणाले. पुढील टप्प्यात, पालिका संपूर्ण रहदारीचा परिसर विकसित करेल आणि रस्ते अधिक चालण्यायोग्य बनवेल, असेही त्यांनी सांगितलं.

"नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी, आम्ही स्थानिक रहिवाशांशी संपर्क साधणार आहोत जेणेकरुन ते बागेची देखभाल करतील आणि देखभालीच्या कामांसाठी पालिकेसोबत समन्वय साधतील." असंही ते म्हणाले.



हेही वाचा

मुंबईत लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारणार

धारावीत देशातील सर्वात मोठे सार्वजनिक सुविधा केंद्र सुरू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा