Advertisement

पुढची सहा वर्षे ट्रायमॅक्सच तिकीट फाडणार


पुढची सहा वर्षे ट्रायमॅक्सच तिकीट फाडणार
SHARES

मुंबई - बेस्टची तिकीट प्रणाली ज्या ट्रायमॅक्स कंपनीच्या माध्यमातून राबवली जाते, त्या ट्रायमॅक्स कंपनीच्या कामावर बेस्ट कर्मचारी, प्रवाशी आणि बेस्ट समितीचे सदस्य नाराज आहेत. अनेक तक्रारी ट्रायमॅक्सबाबत बेस्टकडे दाखल झाल्या आहेत. पण या सर्व तक्रारींकडे कानाडोळा करत गुरूवारी बेस्ट समितीने ट्रायमॅक्सवर मेहेरबानी दाखवली आहे. ट्रायमॅक्सशिवाय यासाठी अन्य पर्याय नसल्यानं ट्रायमॅक्सलाच सहा वर्षांची मुदतवाढ देणं गरजेचं असल्याचं सांगत समितीने यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे आता पुढची सहा वर्षे ट्रायमॅक्सच बेस्टच तिकीट फाडणार आहे. यासाठी बेस्टला 100 कोटी रुपये मोजावे लागणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय