Advertisement

मुंबई मेट्रो ९ मार्गाच्या बांधकामाला सुरूवात

जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीनं या मेट्रो मार्गाचं काम हाती घेतलं असून बांधकामाला सुरूवात केली आहे.

मुंबई मेट्रो ९ मार्गाच्या बांधकामाला सुरूवात
SHARES

मुंबई मेट्रो ९ या ११.३८ किलोमीटर मार्गाच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीनं या मेट्रो मार्गाचं काम हाती घेतलं असून बांधकामाला सुरूवात केली आहे. ही मेट्रो मार्ग दहिसर पूर्व व मिरा-भाईंदरला जोडला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. जानेवारीमध्ये जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) कंत्राट जिंकलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो ९ मार्गाच्या बांधकामासाठी उत्तर-पश्चिम उपनगरात एकून ४९१ पीलर्स टाकण्यात येणार आहेत. पहिला पीलर हा या मार्गाच्या सुरूवातीचं स्थानक असलेल्या पांडुरंग वाडी स्थानका नीजक असणार आहे. शिवाय, प्रत्येक पीलर हे ९ मीटर उंचीचे असणार आहे. पांडुरंग वाडी, मीरा गाव, काशीगाव, साई बाबा नगर, मेदतिया नगर, शहीद भगतसिंग गार्डन आणि सुभाष चंद्र बोस मैदान इथं ७ स्थानकं बांधण्यात येणार आहेत.

कोरोनामुळं प्रकल्पपूर्ती लांबलेल्या मेट्रो २ए (दहिसर ते डीएन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) या दोन मार्गिकांच्या कामांस वेग आला असून, पुढील वर्षी १४ जानेवारीला पहिल्या मेट्रो रेल्वेगाडीची चाचणी होणार आहे. तसंच, मे २०२१पर्यंत या दोन्ही मार्गिका कार्यरत होणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) याआधीच स्पष्ट करण्यात आली आहे.

भविष्यात 'एमएमआरडीए'मार्फत मुंबई आणि महानगर परिसरात १४ मार्गिकांद्वारे सुमारे ३३७ किमीचं मेट्रोचं जाळं उभारण्यात येत आहे. त्यापैकी ३५.१ किमीच्या एकूण २ मेट्रो मार्गिका डिसेंबर २०२० मध्ये कार्यरत करण्याचं उद्दिष्ट होतं. मात्र कोरोना, लॉकडाऊन, मजुरांची कमतरता अशा अनेक कारणानं ही उद्दिष्टपूर्ती लांबली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा