Advertisement

पाम बीच रोड ऐरोली-मुलुंड पुलापर्यंत वाढवणार

नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त केल्या असून ऐरोली-मुलुंड खाडी पुलापर्यंत रस्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पाम बीच रोड ऐरोली-मुलुंड पुलापर्यंत वाढवणार
SHARES

बर्‍याच विलंबानंतर पाम बीच रोड प्रकल्पाच्या घणसोली ते ऐरोली विभागाचे काम अखेर मार्गी लागले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त केल्या असून ऐरोली-मुलुंड खाडी पुलापर्यंत रस्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सुधारित योजनेमुळे रस्त्याची लांबी 1.5 किमीने वाढेल आणि 250 कोटी रुपयांवरून 425 कोटी रुपयांपर्यंत खर्च दुप्पट होईल, असे हिंदुस्तान टाईम्समधील अहवालात म्हटले आहे.

प्रकल्पाची पार्श्वभूमी

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) बेलापूर ते ऐरोली सेक्टर 10ए पर्यंत 21.12 किलोमीटर लांबीचा पाम बीच रोड प्रकल्प 2004 मध्ये प्रस्तावित केला होता. बेलापूर ते घणसोली हा 19.20 किलोमीटरचा रस्ता सिडकोने बांधला होता, मात्र उर्वरित दोन किलोमीटरचे काम रखडले होते.

प्रकल्पासाठी परवानग्या मिळाल्या

NMMC ला प्रकल्पासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी, वन विभाग, खारफुटी संवर्धन समिती, पर्यावरण आणि पर्यावरण-संवेदनशील प्राधिकरणांकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. केवळ मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी प्रलंबित असून, NMMC ने यापूर्वीच अर्ज केला आहे.

प्रकल्प तपशील आणि खर्च

NMMC शहर अभियंता संजय देसाई यांनी म्हटले की, उर्वरित रस्त्याचे बांधकाम आता 3.47 किमीचे असेल, ज्यामध्ये खारफुटीच्या क्षेत्रावरील दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचा समावेश आहे. हा रस्ता १.५ किमीने वाढवण्यात येणार असून, अतिरिक्त कामामुळे प्रकल्पाची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे.

देसाई पुढे म्हणाले की, सिडकोला निम्मा खर्च मिळावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि त्यांना सकारात्मक प्रतिसादाची आशा आहे.

रस्त्याचे महत्त्व

पाम बीच रोड प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनामुळे या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि ऐरोली-मुलुंड खाडी पुलापर्यंतच्या विस्तारामुळे विविध भागांशी संपर्क सुधारेल.

घणसोली-ऐरोली पाम बीच रोड प्रकल्प या भागातील वाहतूक सुरळीत चालण्यासाठी महत्त्वाचा आहे. तसेच हा रोड ऐरोली-मुलुंड पूल आणि निर्माणाधीन ऐरोली-काटई मार्गाला जोडेल, ज्यामुळे वाहनधारकांना कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आणि इतर भागात प्रवास करता येईल. याशिवाय, प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता मदत करेल.



हेही वाचा

डोंबिवलीहून २० मिनिटांत ठाणे गाठा, मेपर्यंत पूल खुला होणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवासाचा वेळ 20 ते 25 मिनिटांनी कमी होणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा